बातम्या

शिवसेना जिल्हा बैठक संपन्न – आगामी कार्यक्रमांसाठी तयार होणारी योजना

जळगाव मध्ये आज, २२/०१/२०२५ रोजी सकाळी ११.०० वाजता जळगाव जिल्हा शिवसेना पदाधिकारी यांची बैठक जळगाव जिल्हा प्रमुख विष्णू भंगाळे यांच्या अध्यक्षतेखाली अजिंठा विश्रामगृह येथे आयोजित करण्यात आली. या बैठकीत जळगाव जिल्ह्यातील शिवसेना कार्यकर्त्यांनी आगामी कार्यक्रमांची तयारी आणि महत्त्वाच्या योजनांवर चर्चा केली.

बैठकीत मुख्य आकर्षण असलेल्या दोन महत्त्वाच्या कार्यक्रमांची चर्चा करण्यात आली.

पहिला कार्यक्रम म्हणजे २३/०१/२०२५ रोजी आयोजित होणारा शिवोत्सव कार्यक्रम, जो बीकेसी मैदान, मुंबई येथे होणार आहे. या कार्यक्रमास माननीय हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त पक्षाचे मुख्य नेते, माननीय ना. श्री. एकनाथरावजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांच्या उपस्थितीत होईल. या कार्यक्रमासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री, मा. ना. श्री. गुलाबरावजी पाटील साहेब तसेच जिल्ह्यातील सर्व आमदार उपस्थित राहणार आहेत. जिल्ह्यातून मोठ्या संख्येने पदाधिकारी आणि शिवसैनिक या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत.

दुसरा महत्त्वाचा कार्यक्रम ०१/०२/२०२५ रोजी जळगाव शहरातील जी.एस. मैदानावर आयोजित होणारा आभार मेळावा आहे, ज्यामध्ये पक्षाचे मुख्य नेते, उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, माननीय ना. श्री. एकनाथरावजी शिंदे साहेब यांची प्रमुख उपस्थिती राहील. या मेळाव्यात जळगाव जिल्ह्याचे सर्व मतदारांचे आभार मानले जातील. या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी बैठक झाली, ज्यात सर्व पदाधिकाऱ्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आणि नियोजनाची आखणी केली.

बैठकीत अन्य मुद्द्यांवरही चर्चा झाली, ज्यामध्ये आगामी निवडणुकीसाठी शिवसेनेच्या रणनितीचा समावेश होता. जिल्हा प्रमुख विष्णू भंगाळे यांनी सर्व कार्यकर्त्यांना सक्रिय राहण्याचे आवाहन केले.

याप्रसंगी नवनियुक्त जळगाव जिल्हा प्रमुख विष्णू भंगाळे यांचा पदाधिकारी यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी प्रमुख पदाधिकाऱ्यांनी त्यांचे अनुभव आणि पुढील कामकाजाच्या बाबत विचार मांडले. या बैठकीला उपस्थित असलेल्या प्रमुख पदाधिकाऱ्यांमध्ये विधानसभा क्षेत्रप्रमुख शामभाऊ कोगटा, महिला जिल्हाप्रमुख सरिताताई माळी-कोल्हे, महानगरप्रमुख संतोष पाटील, तालुकाप्रमुख शिवराज पाटील, महानगर महिला प्रमुख शोभाताई चौधरी, उपजिल्हाप्रमुख स्वप्निल परदेशी, युवासेना उपजिल्हाप्रमुख शंतनु नारखेडे, दिनेश जगताप, तालुका सरचिटणीस राजेंद्र पाटील, शहर प्रमुख कुंदन काळे, शहर प्रमुख गणेश सोनवणे, ॲड. दिलीप पोकळे (शहर संघटक), युवासेना महानगर प्रमुख हर्षल मावळे, ॲड. अभिजीत रंधे, युवासेना उपशहर प्रमुख गणेश गांगुर्डे, उपजिल्हाप्रमुख अनिल भोळे, उपजिल्हाप्रमुख रवी कापडणे, सुनील पाटील, माजी नगरसेवक मनोज आहुजा, माजी नगरसेविका सौ. ज्योतीताई चव्हाण, सौ. भारतीताई रंधे, महिला महानगर प्रमुख सौ. ज्योतीताई शिवदे, विधानसभा क्षेत्रप्रमुख सौ. निशाताई पवार, महिला समन्वयक सौ. पुष्पाताई तळेले, जिल्हा सचिव डॉ. सुषमाताई चौधरी, उपतालुकाप्रमुख प्रवीण परदेशी, तालुका उपप्रमुख महेश चौधरी, माजी नगरसेवक नवनाथ दारकुंडे, माजी नगरसेविका सौ. प्रतिभाताई देशमुख, उप तालुकाप्रमुख संदीप सुरळकर, अमजद खान गबलू खान, शेतकरी सेना उपप्रमुख पुरुषोत्तम पाटील, माजी नगरसेवक किशोर बाविस्कर, महिला शहर प्रमुख सौ. ममता ताई जंजाळे, उपमहानगर प्रमुख राहुल ठाकरे, शहर समन्वयक राहुल नेतलेकर, शुभम निकम शिवसैनिक, अमोल मोरे यांचा समावेश आहे.

बैठकीत सर्व कार्यकर्त्यांना एकजुटीने शिवसेनेच्या उद्दिष्टांचा प्रचार-प्रसार करण्याचे आवाहन करण्यात आले आणि आगामी कार्यक्रमांच्या यशस्वी आयोजनासाठी सर्वांनी परिश्रम घेण्याचे ठरवले.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!