गुलाबराव देवकरांचा अजित पवार गटात प्रवेश !; शरद पवार गटाला मोठा धक्का !
जळगाव जिल्ह्यातील राजकारणात मोठी घडामोड झाली आहे. जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) नेते गुलाबराव देवकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. देवकर यांनी नुकतीच मुंबईत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी गटात प्रवेश करण्याबाबत तयारी दर्शवली आहे.
जळगावमध्ये शरद पवार गटाला धक्का गुलाबराव देवकर हे जळगाव ग्रामीण मतदारसंघातून शरद पवार गटाकडून विधानसभा निवडणूक लढवले होते, मात्र त्यांना पराभव पत्करावा लागला. विधानसभा निवडणुकीतील या पराभवानंतर देवकरांनी अजित पवार गटाकडे जाण्याचा निर्णय घेतल्याने शरद पवार गटाला जळगाव जिल्ह्यात आणखी एक मोठा धक्का बसला आहे.
तटकरेंसोबत सकारात्मक चर्चा गुरुवारी मुंबईत झालेल्या बैठकीत देवकर यांनी सुनील तटकरे यांच्यासोबत सकारात्मक चर्चा केली. या भेटीदरम्यान, देवकरांनी गटात सामील होण्याची तयारी दर्शवली असून, तटकरे यांनीही त्याच्या प्रवेशाबाबत सकारात्मकता व्यक्त केली आहे.
राजकीय परिणाम गुलाबराव देवकर यांच्या या निर्णयामुळे जळगाव जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे. शरद पवार गटाला जिल्ह्यातील आणखी एक महत्त्वाचा नेता गमवावा लागल्याने गटाचे स्थान कमकुवत होणार आहे. दुसरीकडे, अजित पवार गटासाठी हा प्रवेश मोठ्या राजकीय बळाचा ठरेल.
जळगाव जिल्ह्याचे राजकारण तापणार गुलाबराव देवकर यांच्या या हालचालीमुळे जळगाव जिल्ह्यातील राजकारण अधिकच तापणार आहे. आगामी काळात या प्रवेशामुळे स्थानिक आणि राज्यस्तरावर कोणत्या प्रकारचे बदल होतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.