पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची बोरगाव येथे नाना मंत्र्यांना भावनिक भेट

बोरगाव, ता. एरंडोल – जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे पाणीपुरवठा मंत्री मा. गुलाबरावजी पाटील यांनी आज बोरगाव येथे आपले जिव-long मित्र नाना मंत्री यांची त्यांच्या राहत्या घरी जाऊन तब्येतीची विचारपूस केली. गेल्या काही दिवसांपासून आजारी असलेल्या नाना पाटील यांच्या प्रकृतीची माहिती मिळताच पालकमंत्र्यांनी स्वतः पुढाकार घेत भावनिक भेट दिली.
नाना पाटील हे गेल्या २५ वर्षांपासून मा. गुलाबराव पाटील यांचे घनिष्ट मित्र असून प्रत्येक बोरगाव भेटीत मंत्री महोदय नानांची आवर्जून भेट घेत असतात. आज त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळताच पालकमंत्र्यांनी गावातील कार्यकर्त्यांकडून अधिक माहिती घेतली आणि तात्काळ भेट दिली.
या भेटीत त्यांनी नाना पाटील यांच्याशी संवाद साधत त्यांची प्रकृती, उपचार आणि गरजांची सविस्तर विचारपूस केली. त्यांच्या या भेटीमुळे नानांच्या परिवाराला मानसिक दिलासा मिळाल्याचे पाहायला मिळाले.
या भावनिक भेटीदरम्यान गावचे सरपंच भैय्या मराठे, पिंटू पाटील, नितीन पाटील, किशोर मराठे, समाधान मराठे, रवींद्र मराठे यांच्यासह गावातील अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. संपूर्ण गावात या भेटीची चर्चा रंगली असून, एक मंत्री आपल्या मित्रासाठी एवढ्या आपुलकीने भेट देतात हे पाहून उपस्थितांच्या डोळ्यांत पाणी आले.
मित्रत्व, आपुलकी आणि माणुसकी या त्रिसूत्रीचे उत्तम उदाहरण आज बोरगावमध्ये पाहायला मिळाले. पालकमंत्र्यांच्या या भेटीने सर्वत्र कौतुकाचे वातावरण निर्माण झाले आहे.