शिक्षक सन्मान सोहळा – जळगावात आदरांजली आणि सन्मानाचा सोहळा
भाऊसो. गुलाबरावजी पाटील फाऊंडेशन घेऊन येतं शिक्षकांचा गौरव सोहळा – सर्व शिक्षकांसाठी खास!”

जळगाव – पिढ्या घडविणाऱ्या शिक्षकांचे योगदान गौरवण्यासाठी भाऊसो. गुलाबरावजी पाटील फाऊंडेशन यंदाही शिक्षकांचा सन्मान सोहळा आयोजित करत आहे. हा सन्मान सोहळा रविवार, 12 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 9:00 वाजता सुगोकी लॉन, चांदसर रोड, पाळधी येथे पार पडणार आहे.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मा. ना. श्री. गुलाबरावजी पाटील, पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री, महाराष्ट्र राज्य व पालकमंत्री, जळगाव जिल्हा, यांनी राखले असून, प्रमुख मार्गदर्शक म्हणून महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध व्याख्याते मा. श्री. विठ्ठल कांगने सर उपस्थित राहणार आहेत.
शिक्षक सन्मान सोहळ्यात शिक्षकांच्या शैक्षणिक योगदानाची दखल घेत विविध पुरस्कार आणि आदरांजली सादर केली जाईल. फाऊंडेशनने यंदाही शिक्षकांच्या कार्याची आणि समाजातील स्थानाची विशेष गौरवणा-या या सोहळ्याला सर्व शिक्षक, शाळा अधिकारी, पालक आणि नागरिकांना उपस्थित राहण्याचे आमंत्रण दिले आहे.
भाऊसो. गुलाबरावजी पाटील फाऊंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, हा सोहळा शिक्षकांच्या कर्तृत्वाला उजागर करण्याचा आणि समाजात शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करण्याचा उपक्रम आहे.
सर्व उपस्थितांनी अगत्याने सहभागी होऊन शिक्षकांचा गौरव करण्याची विनंती करण्यात आली आहे.