भव्य ‘गुणगौरव सोहळा’ — विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा रंगणार!
गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा! पाळधी सज्ज!

पाळधी (ता. जळगाव) – ज्ञान, प्रगती आणि संस्कार यांचा संगम घडवणाऱ्या GPS कॅम्पस, पाळधी तर्फे शैक्षणिक वर्षातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा “गुणगौरव सोहळा” दिमाखात पार पडणार आहे.
या सोहळ्याचा उद्देश विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षणात केलेल्या उत्कृष्ट कार्याचे कौतुक करून त्यांच्या आत्मविश्वासात भर घालणे हा आहे.
- अध्यक्षस्थान: या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. श्री. गुलाबरावजी पाटील हे भूषवणार आहेत. त्यांच्या उपस्थितीत गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. पाटील साहेबांचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना त्यांच्या पुढील वाटचालीस निश्चितच प्रेरणा देईल.
- प्रमुख मार्गदर्शन: कार्यक्रमास प्रमुख मार्गदर्शक म्हणून महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध व्याख्याते मा. श्री. विनोदजी बाबर सर यांची उपस्थिती लाभणार आहे. आपल्या ओघवत्या वाणीतून आणि प्रभावी विचारांनी ते विद्यार्थ्यांना यशाचे महत्त्व समजावून सांगतील.
- उद्देश: शैक्षणिक क्षेत्रात चमकदार कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचे कौतुक करणे आणि त्यांचे सामर्थ्य सिद्ध करणाऱ्या प्रयत्नांना दाद देणे, हा या गुणगौरव सोहळ्याचा मुख्य उद्देश आहे.
- कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे ‘पॉवरफुल’ पालकमंत्री मा. ना. श्री. गुलाबरावजी पाटील हे असणार आहेत. अत्यंत स्पष्टवक्तेपणा आणि आपल्या ‘गावरान तडक्याच्या’ भाषणाने ओळखले जाणारे पाटील साहेब यावेळी विद्यार्थ्यांना यशाचे गमक सांगणार आहेत. त्यांच्या झंझावाती मार्गदर्शनाने विद्यार्थ्यांच्या भविष्याला नवी दिशा मिळणार आहे.
📅 कार्यक्रमाची तारीख: रविवार, दि. 19 ऑक्टोबर 2025
🕘 वेळ: सकाळी 9:00 वाजता
📍 स्थळ: सुगोकी लॉन, चांदसर रोड, पाळधी
या कार्यक्रमात GPS कॅम्पसच्या विद्यार्थ्यांनी शैक्षणिक, क्रीडा, सांस्कृतिक व सामाजिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीचा सन्मान करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र, ट्रॉफी व गौरवचिन्ह देऊन त्यांचा गौरव करण्यात येईल.
GPS कॅम्पसचे सर्व पदाधिकारी, शिक्षकवृंद आणि पालक वर्ग यांनी विद्यार्थ्यांच्या यशाचा आनंद साजरा करण्यासाठी उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
🎓 “कौतुक आपलं सामर्थ्य सिध्द करण्याऱ्यांच…” या प्रेरणादायी घोषवाक्याने सजलेला हा सोहळा विद्यार्थ्यांसाठी प्रेरणेचा नवा दीप ठरेल.