प्रतापभाऊ आणि सचिनभाऊंच्या वाढदिवसानिमित्त भव्य अन्नदान!

जळगाव –जळगाव येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील आणि युवासेना जिल्हा संघटक सचिन अनिल सोनार यांच्या वाढदिवसानिमित्त अन्नदान कार्यक्रमाचे भव्य आयोजन करण्यात आले. या उपक्रमामुळे रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना दिलासा देत सामाजिक बांधिलकीचे उत्तम उदाहरण समोर ठेवले गेले.
कार्यक्रमाची सुरुवात सचिन अनिल सोनार यांनी गणपती बाप्पाची आरती करून भक्तिभावाने केली. दिवसाची अशी मंगलमय सुरुवात झाल्यानंतर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपस्थित गरजू रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना अन्नदानाचे वाटप करण्यात आले. स्वतःच्या वाढदिवसानिमित्त तसेच जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त हा सेवा उपक्रम राबवण्यात आला.
या अन्नदान कार्यक्रमाला शिवसेना व युवासेनेचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांमध्ये शिवसेना महिला जिल्हा प्रमुख सौ. सरिताताई माळी कोल्हे, जिल्हा प्रमुख विष्णू भाऊ भंगाळे, उपजिल्हा प्रमुख स्वप्निलभाऊ परदेशी, शिवसेना महानगर प्रमुख कुंदन दादा काळे, महानगर प्रमुख संतोष भाऊ चौधरी,युवासेना विस्तारक श्री किशोर भाऊ भोसले,युवासेना जिल्हा प्रमुख रोहित दादा कोगटा, समाजसेवक सागर भाऊ हिवराळे, युवासेना महानगर प्रमुख हर्षल दादा मावळे, युवासेना उप महानगर प्रमुख सनी सोनार, युवासेना महानगर प्रमुख यश सोनवणे, वैद्यकीय मदत कक्ष संपर्कप्रमुख जितू भाऊ गवळी, उपजिल्हा प्रमुख शंतनू नारखेडे यांचा समावेश होता.