माननीय मंत्री गुलाबरावजी पाटील साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत साखर वाटप कार्यक्रम

५ जून –महाराष्ट्र राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार श्री. गुलाबरावजी पाटील साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उत्तरदायित्व जपत एक स्तुत्य उपक्रम राबवण्यात आला.
गुलाबराव पाटलांना शुभेच्छांचा पूर! बघण्यासाठी इथे क्लिक करा
श्री संदीप भाऊ सुरळकर, उपतालुका प्रमुख शिवसेना (शिंदे गट) यांच्या वतीने आदिवासी व दलित बांधवांसाठी मोफत साखर वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या उपक्रमात गरजू नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. सामाजिक सलोखा, एकोप्याचा संदेश देत साखर वाटप करून गुलाबरावजी पाटील यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.
कार्यक्रमात शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांची उपस्थिती लक्षणीय होती.
श्री सुरळकर यांनी सांगितले की, “गुलाबरावजी पाटील साहेब हे नेहमीच गरजूंना मदतीचा हात देतात. त्यांच्या कार्याची प्रेरणा घेऊन आम्ही देखील समाजासाठी काहीतरी सकारात्मक कार्य करण्याचा संकल्प केला आहे.”
हा उपक्रम सामाजिक बांधिलकीचे प्रतीक ठरला असून सर्वत्र त्याचे कौतुक होत आहे.