भुसावळमध्ये मोफत आरोग्य तपासणी शिबीर

जळगाव, दि. ९ जून – छत्रपती संभाजीनगर येथील प्रसिद्ध युनानी वैद्य आणि तिसऱ्या पिढीतील आरोग्यसेवक सूफी हकीम अब्दुल मतीन अशरफी हे आता जळगाव जिल्ह्यातील नागरिकांच्या सेवेसाठी येत आहेत. त्यांच्यावतीने भुसावळ शहरात १३ आणि १४ जून रोजी दोन दिवसीय मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबीर आयोजित करण्यात आले आहे.
हा शिबीर भुसावळ येथील वेलकम मॅरेज लॉन्स येथे सकाळी १० ते रात्री ९ वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. या शिबिरात दररोज सुमारे ७०० ते ८०० नागरिक लाभ घेतील असा अंदाज आयोजकांनी व्यक्त केला आहे. एकाचवेळी १० रुग्णांवर उपचार करण्यात येणार आहेत.
शिबिरात उपलब्ध असलेल्या ५ प्रमुख उपचारपद्धती:
1. मट थेरपी – जमिनीतून ८ फूट खोलवरून माती काढून २ दिवस पाण्यात भिजवून विशेष उपचार केले जातात.
2. पीन पोटली मसाज – आयुर्वेदिक झाडांची पाने तिळाच्या तेलात गरम करून शरीरावर मसाज केली जाते.
3. शिरोधारा – आयुर्वेदिक औषधी तेल कपाळावर धार स्वरूपात सोडून तणाव कमी केला जातो.
4. सुखी पोटली शेक – सेंधव मीठ व इतर आयुर्वेदिक औषधांनी गरम शेक दिला जातो.
5. फिजिओथेरपी – दबलेल्या नसांवरील ताण व वेदनांवर प्रभावी उपचार.
कोणते आजार होतील बरे?
या शिबिरात पुढील आजारांवर प्रभावी उपचार केले जाणार आहेत –
मायग्रेन, डोकेदुखी, तणाव, चिडचिड, अनिद्रा, अपचन, गॅसेस, एसिडिटी, पोट फुगणे, भूक मंदावणे, हात-पाय ओढले जाणे, सांधेदुखी, मणक्याचे विकार, नस दबणे इत्यादी.
विशेष कार्यकर्त्यांचा सहभाग
शिबीराच्या यशस्वी आयोजनासाठी सूफी हकीम अब्दुल मतीन अशरफी यांच्यासह मौलाना अतिउर रेहमान, मोहतरम अय्युब शाह गुलाब शाह, वाहीद शाह, अब्दुल रहीम शाह हे कार्यकर्ते विशेष परिश्रम घेत आहेत.
नावनोंदणी आवश्यक
शिबिरात सहभागी होण्यासाठी पूर्वनोंदणी आवश्यक असून इच्छुकांनी 9370183052 / 9823315312 या क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.