बातम्या

झोपलेल्या आजीवर नातवाकडून जीवघेणा हल्ला – धरणगावात थरकाप

धरणगाव शहरात गुरुवारी, २६ जून २०२५ रोजी दुपारी सव्वा तीन वाजेच्या सुमारास घडलेल्या धक्कादायक घटनेत शेअर मार्केटमध्ये झालेल्या आर्थिक तोट्यामुळे उद्भवलेल्या वादातून एका नातवाने आपल्या सत्तर वर्षीय आजीवर झोपेत असताना कुऱ्हाडीने सपासप वार करून जीवघेणा हल्ला केला. या घटनेने शहरात खळबळ उडाली असून, वृद्ध आजी लीलाबाई रघुनाथ विसपुते (वय ७०, रा. महाबळ, जळगाव) या गंभीर जखमी असून त्यांच्यावर सध्या जळगावमधील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

अपघाताचा बनाव रचून जीवे मारण्याचा प्रयत्न

प्राप्त माहितीनुसार, लीलाबाई या सध्या त्यांच्या मुलगी वैशाली पोतदार यांच्या घरी धरणगाव येथे मुक्कामी राहायला आलेल्या होत्या. वैशाली यांचा मुलगा, तेजस विलास पोतदार (रा. जवाहर रोड, राम मंदिर, धरणगाव) हा शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करत असून त्याने मोठ्या प्रमाणात कर्ज घेतले होते. त्या आर्थिक व्यवहारांवरून त्याचं आणि लीलाबाई यांचं अनेक वेळा वाद होत होते.

हत्येवर पोलिसांची कडक मोर्चेबांधणी!

गुरुवारी दुपारी पुन्हा एकदा दोघांमध्ये वाद झाल्यानंतर लीलाबाई झोपण्यासाठी बेडरूममध्ये गेल्या. यावेळी तेजसने कुऱ्हाड उचलली आणि त्याच्या भावाला “पिंपळाचे झाड तोडायला जातो” असे सांगून खाली उतरला. त्यानंतर लीलाबाई झोपेत असतानाच त्यांच्या डोक्यात कुऱ्हाडीने सपासप वार करत त्यांना रक्ताच्या थारोळ्यात लोटले. हल्ल्यानंतर तेजसने कुऱ्हाड घटनास्थळीच टाकली व भावाकडे धावत जाऊन ‘कोणीतरी आजीवर हल्ला केला’ असा खोटा बनाव करून दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला.

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक

गंभीर जखमी झालेल्या लीलाबाई यांना तातडीने रुग्णवाहिकेतून जळगावमधील खासगी रुग्णालयात हलवण्यात आले असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. या घटनेनंतर लीलाबाई यांचे नातू उमेश धीरेंद्र विसपुते (वय ३८, व्यवसाय शिक्षक, रा. महाबळ कॉलनी, जळगाव) यांनी धरणगाव पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून तेजस पोतदारविरोधात भादंवि कलम ३०७ (खुनाचा प्रयत्न) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

धरणगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक संतोष पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुनील पवार करीत आहेत. आरोपी तेजस पोतदार याला अटक करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!