पंढरपुर येथील खंडणी, खुनाचा प्रयत्न व मोक्का मधील आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळयात

मा.श्री महेश्वर रेड्डी, पोलीस अधीक्षक सो, जळगाव यांनी मा.श्री बबन आव्हाड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव यांना सोलापुर ग्रामीण जिल्ह्यातील पंढरपुर शहर पो.स्टे. गुरनं ३५९/२०२४ भादवि कलम ३०७,३८५ वगैरे या गुन्ह्यातील आरोपी नामे पवन अनिल अधटराव हा जळगाव जिल्ह्यात असल्याची बातमी असल्याने त्याचा शोध घेवून त्यास अटक करणे बाबत आदेश दिलेत.
त्यावर मा.श्री बबन आव्हाड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव यांनी पोउपनिरी श्री दत्तात्रय पोटे, सफौ विजयसिंग पाटील, सुधाकर अंभोरे, अकरम शेख, लक्ष्मण पाटील, राहुल पाटील, जितेंद्र पाटील, भारत पाटील सर्व नेम. स्थागुशा जळगाव अशांचे पथक तयार करण्यात आले होते.
नमुद पथकातील अधिकारी व अमंलदार हे नमुद आरोपीताचा शोध घेत असतांना गुप्त बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, सदरचा आरोपी हा गेंदालाल मिल जळगाव येथे असल्याची बातमी मिळाली त्यावरून नमुद पथकाने सदर आरोपीतास ताब्यात घेवून त्यास त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव पवन अनिल अधटराव, वय २६, रा. पुडलिक जुन्या कोर्टाशेजारी पंढरपुर जि. सोलापुर असे सांगीतले. सदरचा आरोपीताचा पूर्व इतिहास पाहता त्यावर खुनाचा प्रयत्न, खंडणी अश्या प्रकारचे गुन्हे दाखल सदर गुन्ह्यात मोक्का कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल असल्याने पुढील योग्य त्या तपासकरीता पढरपुर शहर पो.स्टे.चे अधिकारी व अमंलदार यांचे ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची कारवाई मा.डॉ.श्री महेश्वर रेड्डी, पोलीस अधीक्षक, जळगाव, मा.श्री अशोक नखाते, अपर पोलीस अधीक्षक, जळगाव यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.