अँड.महेश मुरलीधर जोशी यांची भाजप कायदा सेल जिल्हाध्यक्ष म्हणून नियुक्ती

जळगाव – भारतीय जनता पार्टी जळगाव महानगर जिल्हा कायदा सेल जिल्हाध्यक्ष म्हणून अँड.महेश मुरलीधर जोशी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाचे विद्यमान आमदार श्री. राजू मामा भोळे व जिल्हाध्यक्ष श्री. दीपक सुर्यवंशी यांच्या हस्ते ही नियुक्तीपत्र देण्यात आले.मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष मा. श्री. रविंद्रजी चव्हाण यांच्या आदेशाने केंद्रीय राज्यमंत्री मा. ना. श्रीमती रक्षाताई खडसे. राज्याचे जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री मा.ना.श्री.गिरीषभाऊ महाजन, राज्याचे वस्त्रोउद्योग मंत्री मा.ना.श्री. संजयजी सावकारे, प्रदेश महामंत्री मा.श्री. विजयभाऊ चौधरी, विभागीय संघटनमंत्री मा.श्री. रविंद्रजी अनासपुरे, तसेच खा. श्रीमती स्मिताताई वाघ. मा.आ.श्री. सुरेश (राजूमामा) भोळे, मा.आ.श्री. मंगेशदादा चव्हाण, मा.आ.श्री. अमोलजी जावळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.
अँड. महेश जोशी यांनी सामाजिक, शैक्षणिक आणि कायदेशीर क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्यामुळे पक्षाने त्यांच्यावर विश्वास टाकत ही जबाबदारी सोपवली आहे. संघटनात्मक बांधणी, कायदेशीर सल्लामसलत आणि पक्षातील कार्यकर्त्यांना न्यायिक मार्गदर्शन देण्यासाठी त्यांचा अनुभव मोलाचा ठरणार आहे. त्यांनी पक्षा मध्ये सलग तीन टर्म पासून भाजपाचे जिल्हा सरचिटणीस म्हणून काम पाहिले आहे. विद्यार्थी संघटने पासून त्यांचं हा प्रवास असल्याने संघटन कौशल्य व इतक्या वर्षाचा अनुभव पाहून ही जबाबदारी देण्यात आली
या नियुक्तीबद्दल जळगाव महानगरातील विविध कार्यकर्त्यांकडून आणि समाजातील मान्यवरांकडून अँड.महेश जोशी यांचे अभिनंदन करण्यात येत असून, त्यांच्या नेतृत्वाखाली भाजप कायदा सेल अधिक सक्षम व परिणामकारक कार्य करेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.