ग्रामपंचायत अधिकाऱ्याला लाच घेताना अटक – अमळनेर येथे रंगेहात सापळा कारवाई

धुळे (प्रतिनिधी) –लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, धुळे (ACB) यांच्या पथकाने दिनांक 19 मे 2025 रोजी अमळनेर येथे रंगेहात सापळा रचून ग्रामपंचायत अधिकारी दिनेश वासुदेव साळुंखे (वय 53) यांना ₹40,000/- लाच घेताना अटक केली आहे.
📌 तपशीलवार माहिती:
▪️ युनिट – लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, धुळे
▪️ तक्रारदार – 23 वर्षीय युवक, व्यवसायाने शासकीय बांधकाम ठेकेदार
▪️ आरोपी – दिनेश वासुदेव साळुंखे, ग्रामपंचायत अधिकारी, तामसवाडी ग्रामपंचायत, ता. पारोळा, जि. जळगाव
💰 लाच मागणी व स्वीकार:
तक्रारदाराने महाराष्ट्र शासनाच्या दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत तामसवाडी येथे रस्त्याचे काँक्रीटीकरणाचे सुमारे ₹5 लाख किमतीचे काम पूर्ण केले होते. सदर कामासाठी ₹4 लाखांचे बिल तक्रारदाराच्या बँक खात्यात जमा करण्यात आले. याच कामाच्या मोबदल्यात ग्रामपंचायत अधिकारी दिनेश साळुंखे यांनी ₹40,000/- लाचेची मागणी केली होती.
तक्रारदाराने ही बाब ACB, धुळे यांना कळवली. त्यानंतर पथकाने पडताळणी करून 19 मे रोजी अमळनेर येथील दगडी दरवाजा, राजे संभाजी चौकात आरोपी साळुंखे यांनी ₹40,000/- लाच स्वीकारल्याचे स्पष्ट झाले. लाच घेतल्यानंतर ते दुचाकीवरून पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना त्यांना पथकाने अटक केली.
🔍 पुढील कारवाई:
▪️ आरोपीच्या मोबाईलची तपासणी व घरझडती घेण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे.
▪️ या प्रकरणी अमळनेर पोलीस स्टेशनमध्ये भादंवि व लाचलुचपत प्रतिबंधक अधिनियमाखाली गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
▪️ यामध्ये हॅश व्हॅल्यू घेतली गेली आहे – म्हणजे पुराव्याची शाबिती सायबर स्वरूपात जतन करण्यात आली आहे.
👮 सापळा कारवाईतील अधिकारी:
- पर्यवेक्षण अधिकारी – श्री. सचिन साळुंखे, पोलीस उपअधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, धुळे
- तपास अधिकारी – रूपाली रा. खांडवी, पोलीस निरीक्षक, लाचलुचपत विभाग, धुळे
- सहाय्यक अधिकारी व पथक – पो. हवा. राजन कदम, पो. कॉ. प्रशांत बागुल (ACB धुळे)
- मार्गदर्शक – मा. श्रीमती शर्मिष्ठा घारगे-वालावलकर, पोलीस अधीक्षक, ACB, नाशिक परीक्षेत्र
🧾 नागरिकांना आवाहन:
शासकीय अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांनी कोणतेही काम करण्यासाठी किंवा न करण्यासाठी लाच मागितल्यास तत्काळ खालील क्रमांकांवर संपर्क साधावा:
📞 लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, धुळे: 02562-234020
📞 टोल फ्री क्रमांक: 1064