बातम्या

शिंदे नाराज? दिल्लीतील बैठकीत भाजपला धोक्याचा इशारा!

नवी दिल्ली : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या भाजप, शिंदेसेना आणि ठाकरे गटाच्या हालचालींनी वेग घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यातील भेटीगाठी वाढत असताना, दुसरीकडे शिंदेसेनेत नाराजीचं वातावरण निर्माण झालं आहे. शिंदे गटातील अनेक मंत्री, आमदार सध्या विविध वाद-विवादात अडकलेले आहेत. यामुळे सत्ताधारी शिंदेसेनेची परिस्थिती अडचणीत सापडली आहे.

सरपंच-ग्रामसेवक अनधिकृत व्यक्तीच्या घरी? गावकऱ्यांचा थरारक आरोप!

विशेष म्हणजे, अनेक वादग्रस्त प्रकरणांमध्ये आता चौकशाही सुरू झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवरच मागील आठवड्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अधिवेशन सोडून अचानक दिल्लीला रवाना झाले. त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे. ही भेट अत्यंत गोपनीय ठेवली गेली असली तरी, त्यानंतर भाजपच्या अंतर्गत गोटात काही संकेत गेले असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

आता दरमहा ₹12,000 पेन्शन मिळणार!

मुंबई महापालिका निवडणुकीवर भाजपचा फोकस

भाजपने आता २०२९ लोकसभा निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरू केली असून, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत स्वबळ आजमावण्याची चर्चा सुरू आहे. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीबाबत एक वेगळी भूमिका घेतली आहे. “मुंबईत भाजप आणि शिंदेसेना सोबत लढतील. बाकीच्या ठिकाणी युती करायची की नाही, ते नंतर ठरवू,” असे स्पष्ट संकेत फडणवीसांनी दिले आहेत.

दिल्लीहून शिंदेसेनेला सांभाळून घेण्याचे आदेश देण्यात आल्याचीही माहिती आहे. त्यामुळे भाजप-शिंदेसेना युती कायम राहण्याची शक्यता सध्या तरी जास्त आहे. दुसरीकडे, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यात युती होण्याची शक्यता वर्तवली जात आहे, ज्यामुळे मराठी मतांचे मोठे एकत्रीकरण होऊ शकते, अशी भीती भाजपला आहे.

पंतप्रधान आवास योजनेत गोंधळ; लाभार्थीचं नाव ऑनलाईन यादीतून गायब

शिंदे गटावर दबाव वाढतोय का?

भाजप आणि शिंदेसेना जर स्वतंत्र लढल्या, तर मतविभाजन होऊन उद्धवसेनेला ६० ते ६५ जागा मिळू शकतात, असा अंदाज वर्तवला जात आहे. यामुळेच भाजपला सध्या उद्धवसेनेच्या उभारणीची भीती वाटू लागली आहे. शिंदे गटासोबत युती तोडल्यास भाजपने फक्त स्वार्थासाठी मित्रपक्षांचा वापर केला, असा संदेश जनतेत जाऊ शकतो. ही देखील भाजपसाठी चिंतेची बाब आहे.

भाजपचा प्लान : जास्तीत जास्त जागांवर लढणं

भाजपचा मुंबईत पायाभूत आधार आहे. त्यामुळे भाजप १२० ते १४० जागांवर उमेदवार उभे करून सर्वात मोठा पक्ष होण्याच्या तयारीत आहे. त्यांच्याशी तुलना करता शिंदेसेना तुलनेने कमकुवत असल्याने भाजप अधिक जागांवर दावा करत आहे. एकनाथ शिंदे यांनी मात्र याला विरोध करत अधिक जागांची मागणी केली आहे. कारण त्यांनी मागील काही महिन्यांमध्ये उद्धव ठाकरे गटातील अनेक नगरसेवक गळाला लावले आहेत.

शिंदेंचा नवा प्लान – दलित मतपेढीवर लक्ष

एकनाथ शिंदे यांनी दलित मतदारांना आपल्याकडे वळवण्यासाठी रिपब्लिकन सेनेचे नेते आनंदराज आंबेडकर यांच्यासोबत युती केली आहे. मुंबईत दलित मतांचे प्रमाण मोठे असल्याने शिंदेसेनेचा हा डाव महत्त्वपूर्ण मानला जात आहे. विशेष बाब म्हणजे, रामदास आठवले यांच्या रिपाई पक्षाला युतीमध्ये सामील करूनही शिंदे यांनी वेगळ्या रिपब्लिकन गटाशी युती केली आहे. हे पाहता शिंदे आपली स्वतंत्र ओळख निर्माण करण्याच्या तयारीत असल्याचे स्पष्ट दिसते.

भाजपने उद्धव-राज युतीचा धोका ओळखून शिंदेसेनेसह मुंबई महापालिकेत युती करावी, अशी शक्यता आहे.

शिंदे यांना जागा वाटपावरून नाराजी असून, स्वतंत्र लढण्याची तयारी दिसून येते.

भाजपचा कल अधिक जागांवर लढण्याचा आहे आणि सर्वात मोठा पक्ष होण्याची आकांक्षा आहे.

दलित मतांवर शिंदेसेनेचा फोकस वाढला असून, आंबेडकरी युती राजकारणात नवे समीकरण घडवू शकते.

मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे सगळे राजकीय हालचाल जोरात सुरु आहेत. येत्या काही दिवसांत भाजप, शिंदेसेना आणि ठाकरे गटातील अंतिम निर्णय आणि युतीचं स्वरूप स्पष्ट होईलच!

महाराष्ट्रात आजपासून जोरदार पावसाची शक्यता, ३२ जिल्ह्यांना पावसाचा इशारा

फक्त आधार कार्डवर ₹20,000 मिळवा १० मिनिटांत ₹20,000 खात्यात

लालपरी प्रवाशांसाठी खुशखबर! आता राज्यातील ‘या’ लोकांना १००% मोफत प्रवास मिळणार

माध्यमिक शिक्षण विभागाकडून माहिती लपवली जातेय?

UPI व्यवहाराचे चे नवीन नियम लागू होणार का

ई-श्रम योजना काय आहे? फायदे, पेन्शन, विमा – सविस्तर माहिती येथे!

“शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी! नवी पीकविमा योजना लागू!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!