मुसई खुर्द शाळेत विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचे वाटप : समाजभान जपत विद्यार्थी हिताचा उपक्रम

वार्ताहर – वराड बुद्रुक, ता. धरणगाव मुसई खुर्द येथील प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा लक्षात घेऊन मोफत वह्यांचे वाटप करण्यात आले. महाराष्ट्र शासनाचे स्वच्छता व पाणीपुरवठा मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. गुलाबरावजी पाटील साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यांच्या सामाजिक बांधिलकीतून प्रेरित होऊन जि. प. सदस्य मा. प्रतापरावजी पाटील यांच्या पुढाकाराने हा उपक्रम राबविण्यात आला.
या कार्यक्रमात शाळेतील इयत्ता पहिली ते पाचवीच्या सर्व विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून युवा सेना तालुकाप्रमुख मा. दीपक भदाणे, शिवसेना विभागप्रमुख टीकाराम पाटील, तालुका युवा सेना विभागप्रमुख मनोज पाटील हे उपस्थित होते. त्यांच्याच शुभहस्ते विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमास शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष रवींद्र पाटील, सदस्य सुरेश आधार गुंजाळ, माजी उपसरपंच शंकर पाटील, शे. आजम शेख मण्यार, समिती उपाध्यक्षा सुनीता मोरे तसेच सदस्य प्रवीण पाटील, प्रियंका सोनवणे, मनीषा शिंदे, नितीन पाटील, पुंडलिक पाटील, तुषार पाटील, गोपाल पाटील, रामचंद्र पाटील, अर्जुन पाटील, गोलू सोनवणे, किशोर मराठे आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सुरेख सूत्रसंचालन उपशिक्षक श्री. संजय गायकवाड यांनी केले, तर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी युवा सेना कार्यकर्ते किशोर पाटील तसेच मुख्याध्यापिका रजनी सुरमारे, शिक्षिका वैशाली वाणी आणि सोनल पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, शाळेतील शैक्षणिक कार्यास अधिक गती मिळणार असल्याचे मत शिक्षक व पालकांनी व्यक्त केले. ग्रामीण भागात असे उपक्रम घडल्याने विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध होतात व सामाजिक सहभाग वाढतो, असे प्रतिपादन उपस्थित मान्यवरांनी केले.