बातम्या

आदिवासी भागात धनंजय चौधरी यांचा प्रचाराला उत्स्फूर्त प्रतिसाद घरीघरीं भेट देत घेतला

रावेर_यावल विधानसभा निवडणूक 2024 च्या अनुषंगाने भारतीय राष्ट्रीय काँग्रेस राष्ट्रवादी(शरदचंद्र पवार पक्ष) शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) महाविकास आघाडीचा अधिकृत उमेदवार म्हणून,रावेर_यावल तालुक्यातील मौजे जानोरी_चिंचाटी_तिड्या #मोहमांडली_अंधारमळी_बोरखेडा येथे ग्रामस्थांशी संवाद साधला.विकासाला तुम्ही सगळ्यांनी साथ द्या आता पर्यंत अनेक विकासकामे ही मतदार संघात झाली आहे. तुमची साथ आपल्या धनुभाऊला द्या अशी साद धनंजय चौधरी यांनी यावेळी घातली. पुढे बोलताना ते म्हणाले की , तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने व महाविकास आघाडीच्या जेष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा महाविकास आघाडीचा अधिकृत उमेदवार म्हणून ही निवडणूक लढवत आहे. मतदारसंघातील शेतकरी, कष्टकरी, महिला आणि युवकांचे प्रश्न विधिमंडळात मांडून त्यांची सोडवणूक करण्यासाठी, तसेच रावेर_यावल विधानसभा मतदारसंघाचा शाश्वत विकास साधण्यासाठी ‘#हाताचा_पंजा’ या चिन्हासमोरील बटण दाबून मतदानरूपी आशीर्वाद देण्याची विनंती ग्रामस्थांना केली.गेले अनेक वर्षे मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करताना लोकसेवक मधुकरराव चौधरी साहेबांनी व आमदार शिरीषदादा चौधरी यांनी केलेला सर्वांगीण विकास आणि त्यांचा विकासाचा वसा, वारसा अखंडितपणे पुढे चालवण्याची आम्ही ग्रामस्थांना ग्वाही दिली.आदिवासी भागातील गावांनी नेहमी आमच्या चौधरी परिवारावर प्रेम आणि मतदानरुपी आशिर्वाद दिलेला आहे आमदार शिरीषदादा चौधरी यांनी विविध विकास कामे आदिवासी भागात झालेली आहेत येथील नागरिकांनी केलेल्या विकास कामाबाबद्दल समाधानी व्यक्ती केली यावेळी सोबत महाविकास आघाडीचे प्रमुख पदाधिकारी,कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!