जळगावमध्ये अर्ज दाखल करण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थीत राहणार

जळगावमध्ये महायुती गुरूवारी अर्ज दाखल करण्यासाठी भाजप नेते तथा राज्याचे उमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थीत राहणार
भाजप-शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी अजित पवार, रासपच्या महायुतीचे दोन्ही उमेदवार हे (ता.25) गुरुवार रोजी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत दरम्यान महायुतीकडून या निमित्त जोरदार शक्तीप्रदर्शनाची करण्याची जय्यत तयारी सुरू करण्यात आली आहे.
लोकसभेच्या निवडणुकीसाठी 25 एप्रिलपर्यंतच अर्ज दाखल करण्याची मुदत असल्याने, जळगाव जिल्ह्यातील भाजप-शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी अजित पवार, रासपच्या महायुतीने शेवटच्या दिवशी रावेर तसेच जळगावमधील दोन्ही उमेदवारांचे अर्ज दाखल करण्याचे नियोजन केले आहे. यावेळी सूत्रांच्या महिती नुसार भाजप नेते तथा राज्याचे उमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन तसेच मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे उपस्थित राहण्याची शक्यता.? दोन्ही उमेदवारांचे अर्ज दाखल करताना महायुतीकडून लाखोच्या सुमारास कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत जोरदार शक्तीप्रदर्शनाची तयारी देखील करण्यात आली आहे.