बातम्या

रावेर तालुका मध्ये मोठी कारवाई! २५ किलो गांजा जप्त – आरोपी अटकेत!

NDPS Act अंतर्गत बेकायदेशीर लागवड उध्वस्त!

रावेर (प्रतिनिधी) : जळगाव जिल्हा पोलीस दलाने स्थानिक गुन्हे शाखेच्या विशेष पथकासह रावेर तालुक्यातील सहस्त्रलिंग परिसरात मोठी कारवाई करत कॅनाबिस (गांजा) या अंमली पदार्थाची बेकायदेशीर लागवड उध्वस्त केली आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून एकूण २५.०४५ किलो वजनाचा गांजा (कापडी गोणीसह एकूण २६.३३० किलो) जप्त केला असून, एका आरोपीस अटक करण्यात आली आहे. जप्त मालाची एकूण किंमत सुमारे ₹१,७०,३०६/- इतकी आहे.

ही कारवाई दि. ०७ ऑक्टोबर २०२५ रोजी करण्यात आली.गुन्हा रावेर पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आला आहे.गुन्हा अंमली औषधी द्रव्ये व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५ (NDPS Act) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.गुन्हा कॅनाबिस (गांजा) लागवडीसंदर्भात नोंदवला आहे.आरोपीस अटक करण्यात आली असून, तपास सुरू आहे

गोपनीय माहितीवरून धडक कारवाई

स्थानिक गुन्हे शाखेला काही दिवसांपासून सहस्त्रलिंग परिसरात गांजाची लागवड होत असल्याची गुप्त माहिती मिळाली होती.या माहितीची खात्री करण्यासाठी पोलिस पथकाने सलग दोन दिवस व रात्री गोपनीय तपास आणि माहिती संकलनाचे काम केले, आणि तिसऱ्या दिवशी म्हणजेच दि. ०७ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी थेट शेतावर छापा टाकून कारवाई केली.

छाप्यात शासनाने नवाड पद्धतीने दिलेल्या गट क्र. २३/१ या शेतात गांजाची बेकायदेशीर लागवड आढळून आली. झाडे हिरवी, ओलसर, पाने, फुल्या आणि मुळे मातीसह होती, झाडांची उंची अंदाजे ४ ते ५ फूट इतकी होती. ही लागवड आरोपीने स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी आणि विक्रीच्या उद्देशाने केल्याचे पोलिस तपासात स्पष्ट झाले आहे.

आरोपी अटकेत

या प्रकरणात मेहरबान रहेमान तडवी (वय ३२, रा. सहस्त्रलिंग, ता. रावेर, जि. जळगाव) यास पोलिसांनी अटक केली असून, आरोपीस दि. ०७ ऑक्टोबर २०२५ रोजी रात्री २१.०३ वाजता अटक करण्यात आली.
पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून कॅनाबिस वनस्पती (गांजा) झाडे, पाने, फुल्या, मुळे आणि मातीचे नमुने जप्त केले असून, एकूण निव्वळ वजन २५.०४५ किलो, कापडी गोणीसह २६.३३० किलो असा माल मिळून आला. एकूण किंमत ₹१,७०,३०६/- इतकी असल्याचे नोंदविले आहे.

वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई

ही कारवाई मा. डॉ. महेश्वर रेड्डी (पोलीस अधीक्षक, जळगाव) आणि अप्पर पोलीस अधीक्षक श्री. अशोक नखाते यांच्या मार्गदर्शनाखाली, श्री. राहुल गायकवाड (वरिष्ठ पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव) यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. विशेष पथकात PSI सोपान गोरे, HC संदीप पाटील, HC यशवंत टहाकळे, PC बबन पाटील, PC सचिन घुगे, PC प्रदीप सपकाळे, PC मयूर निकम यांनी सहभाग घेतला. स्थानीक पातळीवरून पोनि डॉ. विशाल देशमुख (पोलीस निरीक्षक, रावेर पो.स्टे.), पोउपनि. मनोज महाजन (तपास अधिकारी) तसेच मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. अनिल बडगुजर यांनी घटनास्थळी भेट देऊन कारवाईचे निरीक्षण केले.

तपास सुरू

घटनास्थळाचा पंचनामा करून कॅनाबिस वनस्पतीचे नमुने फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. शेतातील मातीचे नमुने, मोजमाप, वजन व नकाशे तयार करून पुरावे संकलित करण्यात आले आहेत.
या प्रकरणाचा पुढील तपास पोउपनि. मनोज महाजन (रावेर पोलीस स्टेशन) यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

पोलिसांनी बेकायदेशीर अंमली पदार्थ लागवड करणाऱ्यांना कठोर इशारा दिला असून, अशा कारवाया जिल्हाभरात सातत्याने सुरू राहतील, असे पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!