महाजेनको प्रकल्पात मोठी बैठक! प्रकल्पग्रस्तांसाठी खुशखबर?
दीपनगर वीज प्रकल्पग्रस्तांसाठी दिलासा! प्रशासन थेट मैदानात उतरलं

जळगाव | जिल्हा प्रशासनाच्या पुढाकाराने दीपनगर येथील महाजेनको वीज प्रकल्पात प्रकल्पग्रस्तांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर समन्वय बैठक घेण्यात आली. ही भेट जिल्हाधिकारी श्री. आयुष्य प्रसाद यांच्या सूचनेवरून घेण्यात आली असून, त्यांच्या वतीने अतिरिक्त जिल्हाधिकारी (प्रभारी) व प्रभारी उपविभागीय अधिकारी (पुनर्वसन) श्री. विजय कुमार ढगे यांनी प्रकल्पस्थळी भेट दिली.
या भेटीदरम्यान महानिर्मिती (महाजेनको) भुसावळ औष्णिक विद्युत केंद्र दीपनगरचे मुख्य अभियंता श्री. राजेश मोराळे साहेब आणि इतर संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
💬 बैठकीत पुनर्वसन प्रक्रिया, भरपाई वाटप, प्रकल्पग्रस्तांना नोकरीची संधी, नियुक्त्या, आणि इतर न्याय्य मागण्या याविषयी सविस्तर चर्चा करण्यात आली. महाजेनको प्रशासनाशी थेट संवाद साधून, विविध मुद्यांवर स्पष्टता आणण्यासाठी उपाययोजना सुचवण्यात आल्या.
हे बघा! 3 लाखांचा गांजा जप्त
🔹 प्रकल्पग्रस्त लाभार्थ्यांच्या मागण्यांवर सकारात्मक कार्यवाही होईल, यासाठी प्रशासन आणि महाजेनको यांच्यात सुसंवाद व सहकार्याचे नवे दालन खुले करण्यात आले आहे.
🔸 श्री. ढगे साहेब यांनी सांगितले की,
“जिल्हा प्रशासन प्रकल्पग्रस्तांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे. त्यांच्या न्याय्य हक्कांबाबत कुठलीही तडजोड केली जाणार नाही.”
या दौऱ्यात प्रशासनाने प्रकल्पग्रस्तांचे म्हणणे ऐकून घेतले असून, लवकरच निर्णयप्रक्रियेला गती देण्यासाठी विशेष पुनर्वसन मोहीम राबविण्याचे संकेत दिले आहेत.
पाणीवाला बाबा’ ते ‘दृष्टी देणारा बाबा गुलाबराव पाटील साहेबांच्या पुढाकाराने डोळ्याला उजेड