बातम्या

सामान्यांचे असामान्य भाऊ : ना. गुलाबभाऊ !

जनतेची सेवा करताना रोज प्रत्येक राजकारणी व्यक्तीचा कस लागत असतो. मात्र तीच जनता हा आपला परिवार समजून आपले सेवा आणि कार्य अविरत सुरू ठेवणारे व्यक्तिमत्त्व क्वचितच आढळतात. मी, माझे असे काहीच नाही तुम्ही, आपण मिळून आपला परिवार आहे, असे मानणारे प्रत्येक व्यक्ती आणि माणूस याच्याशी अगदी सहजगतीने बोलणारे गुलाबभाऊ यांची राजकारणी नेतापेक्षा आपल्यातील माणूस म्हणून आज ओळख निर्माण झाली आहे.

आदरणीय ना. गुलाबभाऊ पाटील हे कर्तृत्व शिखराचे मेरुमणी होत ! ‘भाऊ’ शब्द खान्देशात कोणीही उच्चारला तर सर्वप्रथम ऐकणाऱ्याच्या डोळ्यासमोर ना. गुलाबभाऊंचीच प्रतिमा उभी राहते. खान्देशाच्या मातीत गुलाबभाऊ हे प्रत्येकाच्या अंतकरणात ‘भाऊ’ म्हणूनच स्थित आहेत. गुलाबभाऊंचं असणार इतकं अतूट समीकरण या शब्दाशी जोडले आहे किंबहुना या शब्दाला एक वेगळा आयाम गुलाब भाऊंमुळेच प्राप्त झाला आहे.

गिरणामाईच्या कुशीत वसलेल्या छोट्याशा बोरखेडा गावात भाऊंचा जन्म झाला. घरी १८ विश्व दारिद्र्य, वडील गावात शेती करत चार-पाच भाऊ बहिणींचे मोठे कुटुंब. त्यामुळे शालेय शिक्षण पूर्ण करून कुटुंबाला हातभार लावण्यासाठी भाऊंनी पानटपरी चालवली. तिथे येणाऱ्या सर्व स्तरीय सर्वपक्षीय कार्यकर्त्यांशी गप्पा होत असतानाच त्यांच्यात धडाडीच्या निडर नेत्याचे बीजारोपण झाले.

एखादी श्रद्धावान भाविकाच्या भूमिकेत बसून कथा कीर्तन ऐकतात. सामान्यातल्या सामान्य कार्यकर्त्यांकडे विवाह तसेच सुख-दुःखाच्याप्रसंगी भाऊंची भेट ठरलेली असते. आजारी कार्यकर्त्यांची आस्थेवाईकपणे विचारपूस करून उपचारासाठी पदरमोड करतात. त्यांच्याच पुढाकाराने जिल्ह्यातील वारकऱ्यांच्या एकत्रीकरणाला गती मिळाली आहे. ना. गुलाबभाऊ असे सामान्यांचे असामान्य भाऊ आहेत त्यांच्या यशाचा हा आलेख उत्तरोत्तर वाढत राहो, भाऊंना उदंड निरोगी दीर्घ आयुष्य लाभो व त्यांच्या हातून जनता जनार्दनाची सेवा घडो ! ही सदिच्छा व्यक्त करतो. भाऊंच्या वाढदिवसानिमित्त भाऊंना खूप खूप शुभेच्छा देतो…!!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!