जिल्हाधिकारी कार्यालयात लाचखोरीचा स्फोट, दोन अटकेत!

🔸 जळगाव, दि. 23 जुलै 2025 – लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जळगाव युनिटने जिल्हाधिकारी कार्यालयात लाच घेताना एक शासकीय अधिकारी व एक खाजगी व्यक्तीला रंगेहात अटक करून मोठी कारवाई केली आहे. सदर सापळा कारवाई दि. 23 जुलै रोजी करण्यात आली असून, आरोपींनी एका तक्रारदाराकडून शासकीय कागदपत्रांच्या नकलांसाठी 2000/- रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले आहे.
सरपंच-ग्रामसेवक अनधिकृत व्यक्तीच्या घरी? गावकऱ्यांचा थरारक आरोप!
📌 तक्रार व पार्श्वभूमी:
तक्रारदार (पुरुष, वय – 45 वर्षे) यांनी दि. 16 जून 2025 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव येथे त्यांच्या गावातील ग्रामपंचायत व सदस्यांविरोधात दाखल अतिक्रमण प्रकरणाशी संबंधित कागदपत्रांच्या नकलांसाठी अर्ज सादर केला होता. त्यानंतर तक्रारदार वेळोवेळी जिल्हाधिकारी कार्यालयात पाठपुरावा करत होते. त्यावेळी कार्यालयातील सहायक महसूल अधिकारी प्रशांत सुभाष ठाकूर (49 वर्षे) व संजय प्रभाकर दलाल (58 वर्षे, खाजगी इसम) या दोघांनी तक्रारदाराकडून ₹2000/- लाच मागितली.
आता दरमहा ₹12,000 पेन्शन मिळणार!
🔍 ACB ची पडताळणी व सापळा:
तक्रारदाराने याबाबत ACB जळगाव कार्यालयात तक्रार नोंदवली. त्यानंतर लाच मागणीची पडताळणी करण्यात आली. यामध्ये आरोपी क्र. 2 संजय दलाल याने स्पष्टपणे “₹1400 शासकीय फी व झेरॉक्ससाठी आणि ₹600 आमचे” असे सांगून एकूण ₹2000/- ची रक्कम मागितली. या मागणीसाठी आरोपी क्र. 1 प्रशांत ठाकूर यांनी त्याला प्रोत्साहन दिले.
ACB पथकाने सापळा रचून दि. 23 जुलै 2025 रोजी आरोपी क्र. 2 कडून लाच स्वीकारताना रंगेहात अटक केली. कारवाईदरम्यान 2000/- रुपयांची रक्कम जप्त करण्यात आली असून, त्यामध्ये 880/- रुपये शासकीय शुल्क व उर्वरित 1120/- रुपये लाच म्हणून स्वीकारल्याचे निष्पन्न झाले आहे.
पंतप्रधान आवास योजनेत गोंधळ; लाभार्थीचं नाव ऑनलाईन यादीतून गायब
👥 आरोपींची संपूर्ण माहिती:
1️⃣ प्रशांत सुभाष ठाकूर
▪️ वय – 49 वर्षे
▪️ व्यवसाय – शासकीय नोकरी
▪️ पद – सहायक महसूल अधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव (अभिलेख शाखा वर्ग-3)
2️⃣ संजय प्रभाकर दलाल
▪️ वय – 58 वर्षे
▪️ व्यवसाय – खाजगी नोकरी
▪️ राहणार – शिव कॉलनी, जळगाव
▪️ नोकरी – खाजगी इसम, शासकीय व्यवहारात मध्यस्थ
👮♀️ तपास व सापळा अधिकारी:
▪️ श्रीमती स्मिता नवघरे – पोलिस निरीक्षक, ACB, जळगाव
▪️ श्री योगेश ठाकूर – पोलीस उपअधीक्षक, ACB, जळगाव
📞 संपर्क – 9702433131
🚓 सापळा पथकातील सदस्य:
▪️ सहा. पो.उ.नि. सुरेश पाटील
▪️ पो.ना. बाळू मराठे
▪️ पो.कॉ. अमोल सूर्यवंशी
🧭 वरिष्ठ मार्गदर्शक अधिकारी:
▪️ मा. श्री. भारत तांगडे – पोलीस अधीक्षक, ACB नाशिक परिक्षेत्र
📞 – 8888832146
▪️ मा. श्री. माधव रेड्डी – अपर पोलीस अधीक्षक, ACB नाशिक परिक्षेत्र
📞 – 9404333049
📝 पुढील कायदेशीर कार्यवाही:
सदर कारवाईनंतर आरोपींविरोधात जिल्हा पेठ पोलीस स्टेशन, जळगाव येथे भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. लाच रक्कम, व्यवहाराचे डिजिटल पुरावे, तसेच हॅश व्हॅल्यू नोंदवून कायदेशीर पुराव्यांसह पुढील तपास केला जात आहे.