बातम्या

LCB ची धडाकेबाज कारवाई! 9.7 किलो गांजा जप्त, 2 अटकेत

गांजाच्या जाळ्यात पकडले 2 आरोपी! LCB चा सर्जिकल स्ट्राईक

जळगाव, दि. 28 ऑगस्ट 2025 –
जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या (LCB) पथकाने गुरुवारी उशिरा सायंकाळी फैजपूर पोलीस ठाणे हद्दीत न्हावी गावाजवळील शेतातील पत्र्याच्या घरावर छापा टाकून अवैधरित्या अंमली पदार्थ गांजाचा मोठा साठा जप्त करत दोन आरोपींना अटक केली आहे. या कारवाईत तब्बल 9 किलो 717 ग्रॅम गांजा, किंमत अंदाजे ₹1,94,340/- असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने फैजपूर उपविभागात गस्त घालत असताना गोपनीय बातमीदाराकडून खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर तातडीने ही कारवाई करण्यात आली. भर पावसात आणि चिखलातून वाट काढत LCB च्या पथकाने दाखवलेले धाडस आणि तत्परता सध्या सर्वत्र कौतुकास पात्र ठरत आहे.

जळगाव हादरलं! LCB ची धडाकेबाज कारवाई! 9.7 किलो गांजा जप्त, 2 अटकेत


अटक आरोपी

  1. रगन सुकराम बारेला (वय 32, रा. महादेव शिरवेल, ता. भगवानपुरा, जि. खरगोन, मध्यप्रदेश)

  2. अझरुद्दीन अब्दुल वाहिद कुरेशी (वय 27, रा. सिध्दबलपूर, एलहंका, बेगलुरू अर्बन, कर्नाटक)

दोन्ही आरोपी न्हावी गावातून जानोरी गावाकडे जाणाऱ्या रस्त्यालगत असलेल्या किशोर भागवत पाटील यांच्या शेतातील पत्र्याच्या घरात गांजाचा साठा ठेवून विक्री करण्याच्या उद्देशाने तयार होते. पथकाच्या छाप्यात हे दोन्ही आरोपी रंगेहात पकडले गेले.


कारवाईचा तपशील

दि. 28 ऑगस्ट 2025 रोजी स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस उपनिरीक्षक शरद बागल, पोहेकॉ प्रविण भालेराव, पोहेकॉ मुरलीधर धनगर, पोकॉ सिद्धेश्वर डापकर, पोकॉ गोपाल पाटील आणि चा. पोकॉ महेश सोमवंशी हे गणेशोत्सवाच्या अनुषंगाने फैजपूर उपविभागात गस्त घालत होते. त्याच वेळी गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली की, फैजपूर पोलीस ठाणे हद्दीत एका शेतात आरोपी अवैधरित्या गांजाचा साठा ठेवून विक्रीसाठी तयारी करत आहेत.

तत्काळ ही माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्याकडे पोहोचवण्यात आली. त्यांच्या मार्गदर्शनानुसार पथकाने फैजपूर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सपोनि. रामेश्वर मोताळे यांच्याशी संपर्क साधून कारवाईसाठी आवश्यक सर्व कायदेशीर बाबींची पूर्तता केली. यावल पोलीस ठाण्याचे पोनि. रंगनाथ धारबळे यांच्या मदतीने तसेच शासकीय पंचांच्या उपस्थितीत छापा टाकण्यात आला.

छाप्यात पत्र्याच्या घरातून 9 किलो 717 ग्रॅम वजनाचा गांजाचा साठा जप्त करण्यात आला, तर आरोपींना ताब्यात घेऊन फैजपूर पोलीस ठाण्यात आणले. आरोपींविरुद्ध NDPS Act अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास सुरु आहे.

जळगाव पोलीस दलात वादळी बदल – निरीक्षक संदीप पाटील यांची बदली, गायकवाड यांची धडाकेबाज एन्ट्री

कारवाई वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली

या धाडसी कारवाईसाठी पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल बडगुजर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.


कारवाईत सहभागी पथक

या कारवाईत फैजपूर पोलीस ठाण्यातील पो.उप.नि. निरज बोकील, पो.उप.नि. विनोद गाभणे, सफौ. देविदास सुरदास, पोहेकॉ देवेंद्र पाटील, पोहेकॉ विकास सोनवणे, पोकॉ भुषण ठाकरे तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे सर्व अधिकारी व अंमलदार सहभागी झाले होते.

जळगाव जिल्हा स्थानिक गुन्हे शाखेत मोठे बदल : निरीक्षक संदीप पाटील यांची बदली, राहुल गायकवाड यांची नियुक्ती


कौतुकास पात्र धाडस

सतत कोसळणाऱ्या पावसात आणि शेतातील चिखलात अडथळ्यांवर मात करत, काटेकोर नियोजन आणि टीमवर्कच्या जोरावर ही कारवाई यशस्वी करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखा, जळगावच्या पथकाचे या धाडसी मोहिमेबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.

जळगाव जिल्ह्यातील स्थानिक गुन्हे शाखेच्या धडाकेबाज,अॅक्शन मोडमध्ये असलेले नवीन निरीक्षकपदी राहुल गायकवाड साहेबांची नियुक्ती झाल्याने गुन्हे तपासात अधिक वेग आणि काटेकोरपणा येणार आहे. त्यांच्या अचूक नियोजनशैलीमुळे आणि धडाकेबाज कार्यपद्धतीमुळे गुन्हे नियंत्रणात आणखी प्रभावी पावले उचलली जातील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.त्यांच्या धडाकेबाज कार्यशैली, तडाखेबाज निर्णयक्षमता आणि झटपट अंमलबजावणीमुळे जिल्ह्यात गुन्हेगारीला चाप बसणार हे नक्की.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!