गावठी कट्ट्यासह दोन संशयित शनीपेठ पोलिसांच्या ताब्यात

जळगाव: शहरातील नेरी नाका परिसरात गावठी कट्टा घेऊन दोन जन फिरणाऱ्याला शनिपेठ पोलिसांनी रविवारी २१ जुलै रोजी दुपारी ४:०० वाजता अटक केली आहे. या प्रकरणी शनीपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील नेरी नाका परिसरात मध्ये संशयित आरोपी गणेश हिंमत कोळी (वय-२३) रा. धानोरा ता. चोपडा जि. जळगाव हे.ल.मु. हा हातात गावठी कट्टा घेऊन फिरत असल्याची महिती शनिपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांना मिळाली त्यानुसार त्यांनी कारवाई करण्याच्या सूचना दिल्या.
त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत धनके व सोबत पोलीस कॉन्स्टेबल अनिल कांबळे, पोलीस कॉन्स्टेबल मुकुंद गंगावणे, पोलीस कॉन्स्टेबल विकी इंगळे, पोलीस कॉन्स्टेबल रवींद्र साबळे, पोलीस कॉन्स्टेबल अमोल वंजारी, यांनी कारवाई करा संकेत आरोपी गणेश कोळी याला ताब्यात घेतले. त्याजवळ असलेल्या गावठी कट्ट्याबाबत विचारपूस केली तो उडवाउडवीची उत्तरे देत होता केसांनी खाक्या दाखवताच सांगितले की ही गावठी कट्टर मित्र विनय जितेंद्र कोळी यांच्याकडे जिल्हा असलेल्या सांगितले त्यानुसार पोलिसांनी मोहाडी शहरातील उमेश पार्क शेतात जाऊन गोट्यातून गावठी कट्टा जप्त केला आहे.
विनय जितेंद्र कोळी (वय-३४) रा. मोहाडी ता. जि जळगाव याला देखील पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.
प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल अनिल कांबळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शनिपत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेच्या पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत धनके हे करीत आहे.