बातम्या

गॅस सिलेंडरचा काळाबाजार उघड – एमआयडीसी पोलिसांची कारवाई, आरोपी अटकेत

जळगाव जिल्ह्यात अवैध गॅस रिफिलींगविरोधात पोलिसांची धडक कारवाई सुरूच आहे. एमआयडीसी पोलिसांनी रामेश्वर कॉलनी येथे छापा टाकून घरगुती सिलेंडरमधील गॅस व्यावसायिक सिलेंडरमध्ये भरून काळाबाजार करणाऱ्या किरण भागवत पाटील यास अटक केली.

पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या आदेशानुसार, दिनांक 08/02/2025 रोजी पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनिरीक्षक चंद्रकांत धनके यांच्या नेतृत्वाखालील पथकाने छापा टाकला. आरोपीच्या घरातून 54 गॅस सिलेंडर (घरगुती – 22, व्यावसायिक – 32) आणि गॅस रिफिलींगसाठी वापरण्यात येणारी इलेक्ट्रिक प्रेशर मोटर जप्त करण्यात आली.

सदर प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 88/2025 अंतर्गत बीएनएस कलम 287 व जीवनावश्यक वस्तू कायदा कलम 3, 7 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीस अटक करून 11/02/2025 पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

ही कारवाई अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप पाटील, पोउपनिरीक्षक चंद्रकांत धनके, अशोक काळे, पोहेका राजेंद्र कांडेकर, पोना. हेमंत जाधव, योगेश बारी, सिध्देश्वर डापकर, योगेश घुगे यांनी केली. तपास पो.उप.नि. अशोक काळे व पो.शि. नरेंद्र मोरे करीत आहेत.

एमआयडीसी पोलिसांनी नागरिकांना अवैध गॅस रिफिलींगबाबत तत्काळ माहिती देण्याचे आवाहन केले आहे. माहिती देणाऱ्यांचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!