भुसावळ: डीडी सुपर कोल्ड्रिंक्स आणि चहा दुकानात खून

भुसावळ येथील खडका रोडवरील अमरदीप टॉकीज जवळ असलेल्या डीडी सुपर कोल्ड्रिंक्स आणि चहा दुकानात आज सकाळी खून झाल्याची घटना घडली. मृतक तहरीन नजीर शेख (वय 30) असे ओळखले जाते. सकाळी चहा पिण्यासाठी तहरीन या दुकानात आला होता, त्यावेळी संशयित आरोपीने त्याच्यावर बंदुकीने पाच गोळ्या झाडून त्याचा खून केला. तहरीन याचा जागीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, आरोपीचा शोध सुरू आहे. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रिदम रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. प्राथमिक तपासानुसार, हा खून पूर्ववैमनस्यातून घडला असल्याचे सांगितले जात आहे.
पोलीस अधिक तपास करत आहेत.
भुसावळमध्ये गुन्हेगारी थांबवण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात असल्या तरी गुन्हेगारी कमी होण्याऐवजी सतत वाढत असल्याचे दिसून येत आहे. आजच्या घटनेने पुन्हा एकदा सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे.