भुसावळ : भव्य भुलाबाई महोत्सवाचे आयोजन – महिलांना कलागुण प्रदर्शनासाठी प्रतिष्ठित व्यासपीठ
भुसावळ : भव्य भुलाबाई महोत्सवाचे आयोजन – महिलांना कलागुण प्रदर्शनासाठी प्रतिष्ठित व्यासपीठ

भुसावळ : स्थानिक लोकपरंपरा, संस्कृती व लोककला यांना भक्कम आधार देण्यासाठी तसेच महिलांना आपल्या कलागुणांचे प्रदर्शन करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने केशव स्मृती प्रतिष्ठान आणि प्रतिष्ठा महिला मंडळ, भुसावळ यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य भुलाबाई महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. हा भव्य सांस्कृतिक सोहळा सोमवार, दि. ८ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ११.०० वाजता संतोषी माता हॉल, भुसावळ येथे पार पडणार आहे.
महोत्सवासाठी विविध वयोगटांतील स्पर्धकांना संधी उपलब्ध करून देण्यात आली असून सहभागी गटांचे वर्गीकरण खालीलप्रमाणे करण्यात आले आहे –
-
लहान गट : वय ५ ते १० वर्षे
-
मोठा गट : वय ११ ते १६ वर्षे
-
खुला गट : वय १७ वर्षांवरील सर्व वयोगट
आकर्षक पारितोषिकांची मेजवानी
भुलाबाई महोत्सवातील विजेत्यांसाठी आकर्षक पारितोषिकांची सोय करण्यात आली आहे.
-
प्रथम पारितोषिक : ₹5,000
-
दुसरे पारितोषिक : ₹3,100
-
तिसरे पारितोषिक : ₹2,100
-
उत्तेजनार्थ पारितोषिक : ₹1,100
याशिवाय स्वतः तयार केलेल्या आणि बोलीभाषेतील भुलाबाईशी संबंधित गाण्यांना विशेष उत्तेजनार्थ पारितोषिक दिले जाणार आहे. तसेच खुल्या गटातील संघांनी लोकसंस्कृतीशी निगडीत सामाजिक संदेश देणाऱ्या गाण्यांना प्राधान्य दिले जाईल.
स्पर्धेसाठी महत्त्वाच्या सूचना व नियमावली
- प्रत्येक संघाला सादरीकरणासाठी ५ मिनिटांचा वेळ दिला जाईल; वेळ संपल्यानंतर घंटानाद केला जाईल.
- ध्वनीमुद्रीत गाणी (सीडी, पेन ड्राईव्ह) मान्य केली जाणार नाहीत; गाणी तोंडी म्हणावी लागतील.
- प्रत्येक गटात १२ ते १५ जणांचा सहभाग आवश्यक आहे.
- गीत, नृत्य, वेशभूषा, सांघिकता आणि सामाजिक संदेश या निकषांवर गुणांकन केले जाईल.
- प्रत्येक सहभागीस सहभागाचे प्रमाणपत्र दिले जाईल.
- प्रवास भाडे व जेवणाची सोय आयोजकांकडून करण्यात येणार नाही.
- सर्व गटांनी कार्यक्रमाच्या दिवशी वेळेवर उपस्थित राहणे आवश्यक आहे.
- सहभाग नोंदणी दि. ५ सप्टेंबर २०२५ पर्यंत करणे बंधनकारक आहे.
संपर्कासाठी जबाबदार व्यक्ती
-
सौ. अनिता आंबेकर – 09623037418
-
सौ. सोनल महाजन – 0913037418
-
सौ. जयश्री चौधरी – 09158823288
-
सौ. वैशाली सैतवाल – 09511886655
-
सौ. राजश्री बादशाह – 08600783976
-
श्री. दिपक पाटील (जोगलखेडा) – 09022875627
या महोत्सवाच्या माध्यमातून स्थानिक संस्कृतीला नवसंजीवनी मिळणार असून महिलांना आपल्या कलागुणांची ओळख करून देण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे. आयोजकांनी शहरातील नागरिक, महिला मंडळे तसेच तरुण-तरुणींना जास्तीत जास्त संख्येने सहभाग नोंदवून कार्यक्रम यशस्वी करण्याचे आवाहन केले आहे.