बातम्या

बच्चू कडूंचा एल्गार! कर्जमाफीसाठी महाराष्ट्र थांबणार?

📍 मुंबई | २८ जून २०२५ राज्यातील शेतकरी कर्जमाफी (Farmer Loan Waiver) विषयावरून पुन्हा एकदा राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. प्रहार संघटनेचे (Prahar Sanghatana) अध्यक्ष व आक्रमक नेते म्हणून ओळखले जाणारे आमदार बच्चू कडू (MLA Bacchu Kadu) यांनी सरकारला थेट इशारा दिला आहे की शेतकऱ्यांशी संबंधित आश्वासने पाळली नाहीत, तर आंदोलन अटळ आहे.


📌 कर्जमाफी समिती गठीत करण्याचं आश्वासन १५ दिवसांत पाळलं नाही – बच्चू कडू संतापले

काही दिवसांपूर्वी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बच्चू कडूंना स्पष्ट आणि लेखी आश्वासन दिलं होतं की, शेतकरी कर्जमाफीसाठी विशेष समिती गठीत केली जाईल.

पण १५ दिवस उलटून गेले तरी सरकारकडून कोणतीही कारवाई झाली नसल्याने बच्चू कडूंनी आक्रमक पवित्रा घेत सरकारवर सडकून टीका केली आहे.


🔥 “शेतकऱ्यांसाठी ‘बंडीचा वेग’ का?” – बच्चू कडूंचा सडेतोड सवाल!

आपल्या नेहमीच्या खास शैलीत बच्चू कडूंनी म्हटलं:

“आता समिती गठीत करणार होते, १५ दिवसांत लेखी लिहून दिलेलं बावनकुळे साहेबांनी. आता समिती गठीत झाली नाही म्हणजे तुमच्या सरकारचा स्पीड किती जलद आहे, ते शकुंतला एक्सप्रेस आहे की गीतांजली आहे, हे अजून समजायला कारण नाहीये.
म्हणजे बाकी काम विमानाच्या स्पीडनं करता आणि शेतकऱ्याच्या कर्जमाफीचा वेळ आला की बंडी न धावता तुम्ही. म्हणजे बंडीतल्याच माणसाला मारायचा प्रयत्न करताय.
म्हणून आम्ही २ तारखेचा दिवस ठेवला आहे. महाराष्ट्राला हे दाखवायचं आहे की शेतकरी, शेतमजूर कसे आंदोलन करू शकतात!”


🚨 २ जुलैला आंदोलनाचा इशारा; सरकारची जागा!

बच्चू कडूंनी २ जुलै रोजी महाराष्ट्रव्यापी आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर सरकारच्या हालचालींना गती मिळाली.
मंत्री बावनकुळे यांनी तत्काळ प्रतिक्रिया दिली आणि सरकार तोडगा काढण्यासाठी पुढे सरसावलं आहे.


🧾 ३ जुलै रोजी १० मंत्र्यांसोबत मॅरेथॉन बैठक

बावनकुळे यांनी दिलेल्या माहितीनुसार:

  • ३ जुलैला दुपारी ४ ते रात्री १० पर्यंत बैठका

  • १० मंत्र्यांचा समावेश असलेली बैठक – प्रत्येक मंत्री वेगवेगळ्या मागण्यांवर चर्चा करणार

  • विधानभवनात खास दालनात चर्चा

  • शेतकरी, दिव्यांगांसह इतर १४-१५ मुद्द्यांवर ठोस निर्णय घेणार

  • शासन निर्णय (Government Resolution) अधिवेशन काळात होणार

“मुख्यमंत्र्यांशी कालच चर्चा झाली आहे. समिती तयार होत आहे आणि अधिवेशनात ती घोषित केली जाईल. जे महत्त्वाचे मुद्दे आहेत त्यावर शासन निर्णय होतील.” – बावनकुळे


👀 आता संपूर्ण राज्याचे लक्ष २ आणि ३ जुलैवर!

  • २ जुलै – शेतकरी आंदोलन पेटणार?

  • ३ जुलै – सरकारचा निर्णायक तोडगा बाहेर पडणार?

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!