अजित पवारांची लाडक्या बहिणींना मोठी घोषणा! उद्यापासून खात्यावर पैसे!

मुंबई | 29 जून 2025 – राज्याच्या लाडक्या बहिणींसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून पुढील हप्त्याची प्रतीक्षा करणाऱ्या महिलांसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज मोठी घोषणा केली आहे. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, ३० जूनपासून महिलांच्या खात्यावर थेट पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे.
💰 3600 कोटींचा थेट निधी DBT द्वारे ट्रान्सफर
राज्य सरकारने 3600 कोटी रुपये थेट DBT (Direct Benefit Transfer) प्रणालीद्वारे लाडक्या बहिणींच्या खात्यावर ट्रान्सफर केले आहेत. आज झालेल्या पत्रकार परिषदेत अजित पवार म्हणाले, “लाडक्या बहिणींना आता पुढील हप्ता वाट पहावी लागणार नाही. ३० जूनपासून रक्कम त्यांच्या खात्यावर जमा होईल. याबाबतची प्रक्रिया पूर्ण झाली आहे.“
🔄 मागील काही दिवसांपासून प्रश्न होत होते
गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात महिलांच्या मनात एकच प्रश्न होता – “पुढचा हप्ता कधी मिळणार?” सोशल मीडियावर देखील या संदर्भात विचारणा होत होती. अनेक महिलांनी शासनाच्या विविध विभागांशी संपर्क केला होता. या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी केलेली ही घोषणा अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.
🥳 महिलांमध्ये आनंदाचं वातावरण
या घोषणेनंतर राज्यातील लाखो महिलांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. सरकारच्या या पावलाने महिला सक्षमीकरणासाठीचा एक महत्त्वाचा टप्पा पार झाला आहे, असंही सांगितलं जात आहे.