बातम्या

धरणगाव येथे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते मुस्लिम समाजाच्या विविध सामाजिक सभागृहाचे भूमिपूजन संपन्न

धरणगाव प्रतिनिधी दि. 13 – धरणगाव येथे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी मुस्लिम पंचमंडळला दिलेला शब्द पाळला असून जिल्हा वार्षिक योजने अंतर्गत मुस्लिम समाजाच्या विविध 9 ठिकाणी 2 कोटी 64 लाख रुपये निधी तर विविध विकास कामांसाठी 75 लक्ष निधी मंजूर करून मुस्लिम समाजासाठी विविध सामाजिक सभागृहाचे भूमिपूजन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी सांगितले की, मुस्लिम समाजाच्या सभागृहाच्या उभारणीमुळे मुस्लिम समाजातील समता आणि एकता दृढ होण्यास मदत होवून सामाजिक प्रगती साधता येईल. धरणगाव येथे मुस्लिम समाज व पंच मंडळ आयोजित कार्यक्रमा प्रसंगी बोलत होते.*यावेळी पालकमंत्र्यांनी सांगितले की, “मुस्लिम समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी माझ्यासह शासन कायमच प्रयत्नशील आहे. या सभागृहाच्या माध्यमातून मुस्लिम समाजातील लोकांच्या शैक्षणिक, सांस्कृतिक आणि सामाजिक उपक्रमांना चालना मिळेल. पंच मंडळासाठी निधीची कमतरता भासू देणार नसून सामाजिक सभागुहांमुळे एकात्मता वाढेल आणि सर्वसमावेशक विकास साधण्यास मदत होईल. असा विश्वास पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केला. यावेळी काय स्व. सलीम पटेल यांच्या आठवणीने पालकमंत्र्यांना गहिवरून आले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन उपशिक्षक शाहीर शेख यांनी केले तर आभार हाफिज शेख यांनी मानले.*3 कोटी 40 लाखाच्या सामाजिक सभागृह व विविध विकास कामांचे झाले भूमिपूजन*डीपीडीसी अंतर्गत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी नगरोत्थान व दलितेत्तर योजने अंतर्गत धरणगाव येथील मुस्लिम परिसरात नऊ ठिकाणी 2 कोटी 64 लक्ष निधी सामाजिक सभागृह साठी मंजूर केला आहे. यात बेलदार सामाजिक सभागृह 60 लक्ष, मशिद अली मोहल्ला परिसर 50 लक्ष, पोलीस लाईन परिसरात 25 लक्ष, खाटीक मोहल्ला परिसरात 20 लक्ष, पातळ नगरी परिसरात -17 लक्ष, कुरेशी पंचमंडळ मोहल्ला परिसरात 20 लक्ष, मोमीन मोहल्ला 24 लक्ष, घाटोळ अली मोहल्ला परिसरात 22 लक्ष, बागवान मोहल्ला परिसरात 20 लक्ष , असे सामाजिक सभागृहाचे तसेच 75 लाखाच्या विविध विकास कामांचे आज पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन संपन्न झाले.याप्रसंगी शिवसेनेचे बेलादर समाज व मुस्लिम पंचमंडळाचे अध्यक्ष अमजद खान, इसरफ अली, उपजिल्हाप्रमुख पी.एम. पाटील सर, शहर प्रमुख विलास महाजन, माजी गटनेचे पप्पू भावे , युवा कार्यकर्ते तौसिफ पटेल, नगरसेवक अहमद पठाण, सुरेश महाजन, वासुदेव चौधरी, वाल्मीक पाटील, बूट्या पाटील, भानुदास विसावे, अमजद मिस्तरी, अश्फाक मिस्तरी, आबिद खान, एजाज खान, कालू वस्ताद, असलम शेख, इब्राहिम जनाब, कालू दादा, कमरोद्दीन मोमीन, फरीद दादा, सत्तार दादा, फकरैद्दीन मोमीन, सरफराज मोमीन, बासिद मोमीन, कॉन्टॅक्टर शेख मेहमूद मिस्त्री, नसीरोद्दीन हाजी, शेख खलील मिस्तरी अश्फाक शेख, मेहबूब मिस्त्री, सलीम मोमीन, पी. आय. पवन देसले यांच्यासह मुस्लिम पंच कमिटीचे पदाधिकारी सदस्य व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!