अमित शहा यांनी 4 मंत्र्यांना हटवण्याचा निर्णय घेतला’ ?

महाराष्ट्रात राजकारणात सध्या एका नव्या वादळाची शक्यता निर्माण झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचा एक व्हिडीओ ‘एक्स’वर (पूर्वीचे ट्विटर) शेअर केला आहे, ज्यामध्ये कोकाटे मोबाईलवर ‘रमी’ गेम खेळताना दिसत आहेत.या घटनेनंतर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे खासदार संजय राऊत यांनी एक धक्कादायक दावा करत राजकीय वर्तुळात मोठे वादळ निर्माण केले आहे.
फक्त आधार कार्डवर ₹20,000 मिळवा १० मिनिटांत ₹20,000 खात्यात
राऊत यांच्या म्हणण्यानुसार, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी महाराष्ट्रातील चार मंत्र्यांना मंत्रिमंडळातून बाहेरचा रस्ता दाखवण्याचा निर्णय घेतला असून, त्यात माणिकराव कोकाटेंचेही नाव असल्याचे त्यांनी सूचित केले आहे.राऊत यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, “माझी खात्रीशीर माहिती आहे की अमित शाह यांनी महाराष्ट्रातील चार मंत्र्यांना मंत्रिमंडळातून वगळण्याची सूचना केली आहे. या यादीत कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचे नाव आघाडीवर आहे.” अमित शाह यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना त्यांच्या गटातील तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही मंत्र्यांना मंत्रिमंडळातून हटवण्याबाबत निर्देश दिल्याचे राऊत यांनी स्पष्ट केले.
लालपरी प्रवाशांसाठी खुशखबर! आता राज्यातील ‘या’ लोकांना १००% मोफत प्रवास मिळणार
“केंद्रातील सत्ता दुटप्पीपणाने वागतेय” – राऊतांचा हल्लाबोल यावेळी राऊत यांनी केंद्र सरकारवरही जोरदार टीकास्त्र सोडले. “केंद्रातील सरकार हे दुटप्पी आणि ढोंगी आहे,” असे ते म्हणाले. छत्तीसगडमध्ये ऑनलाइन गेमिंगशी संबंधित प्रकरणात अनेक राजकीय नेत्यांवर कारवाई झाली, अगदी काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्या मुलालाही ईडीने अटक केली. मात्र, महाराष्ट्रातील सत्ताधारी नेते अशाच प्रकारच्या ऑनलाइन गेमिंगमध्ये गुंतलेले असताना, त्यांच्यावर ईडी किंवा सीबीआयकडून कोणतीही कारवाई होत नाही. “छत्तीसगड, झारखंड किंवा दिल्लीतील अनेक उद्योगपती आणि राजकारण्यांवर कारवाई होते, पण महाराष्ट्रातील सत्ताधाऱ्यांकडे दुर्लक्ष केले जाते, हा सरळसरळ दुटप्पीपणा आहे,” असा आरोप करत त्यांनी केंद्राच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले.
माध्यमिक शिक्षण विभागाकडून माहिती लपवली जातेय?
राज ठाकरे-उद्धव ठाकरे युतीची शक्यता: राऊतांचे सूचक विधान दरम्यान, अलीकडेच ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी ‘सामना’ला दिलेल्या मुलाखतीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासोबतच्या संभाव्य युतीबाबत सकारात्मक संकेत दिले होते. उद्धव ठाकरे म्हणाले होते की, “ठाकरे बंधू एकत्रच आहेत. तुम्हाला काही अडचण आहे का? मी आजही राज ठाकरे यांना फोन करू शकतो, त्यांच्याशी बोलू शकतो, त्यांना कधीही भेटू शकतो.” यावर संजय राऊत यांना विचारले असता, त्यांनीही सूचक विधान केले.
UPI व्यवहाराचे चे नवीन नियम लागू होणार का
“जर शिवसेना पक्षप्रमुखांनी असे संकेत दिले असतील, तर त्यांचा प्रश्न, ‘कुणाला काही प्रॉब्लेम आहे का?’ हाच माझाही प्रश्न आहे,” असे राऊत म्हणाले. राज ठाकरे यांनी मीरा-भाईंदर येथील सभेत सकारात्मक वक्तव्य केले आहे आणि उद्धव ठाकरे यांनीही मुलाखतीत तसाच सूर लावला आहे. त्यामुळे आता यावर जास्त चर्चा न करता, भविष्यात होणाऱ्या घडामोडींवर लक्ष ठेवणे महत्त्वाचे आहे, असे सांगत त्यांनी दोन्ही ठाकरे बंधूंच्या संभाव्य एकजुटीचे संकेत दिले.