स्थानिक गुन्हे शाखा जळगाव व अडावद पोलीस स्टेशन यांनी खुनाचा गुन्हा उघडकिस आणुन आरोपी केले जेरबंद
अडावद पोलीस स्टेशन हददीत अडावद गावामध्ये अंधार असलेल्या ठिकाणी इसम नामे बापु हरी महाजन याचा अज्ञात इसमांनी केबलच्या सहाय्याने गळा आवळुन, त्यास लाकडी दांडक्याने मारहाण करुन त्याच्या डोक्यात दगड मारुन खुन करण्यात आला होता. सदर खुनाचा उलगडा करून आरोपी अटक करणे बाबत मा.श्री महेश्वर रेड्डी, पोलीस अधीक्षक सो, जळगाव यांनी मा.श्री बबन आव्हाड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव यांना आदेश दिलेत.त्यावर मा.श्री बबन आव्हाड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव यांनी पोउपनिरी श्री गणेश वाघमारे, पोह दिपक माळी, रविंद्र पाटील, विलेश सोनवणे, प्रदिप चवरे, महेश सोमवंशी सर्व नेम. स्थागुशा जळगाव अश्यांचे पथक तयार करण्यात आले होते. तसेच अडावद पोलीस स्टेशनचे सपोनि श्री प्रमोद वाघ, पोउपनिरी श्री राजु थोरात सफौ शरिफ तडवी, भरत नाईक, सतिष भोई, भुषण चव्हाण, किरण शिरसाठ, शेषराव तोरे, शुभम बावीस्कर, मुकेश तडवी, विनोद धनगर, संजय धनगर, चद्रकांत कोळी सर्व नेम. अडावद पो.स्टे.नमुद पथकातील अधिकारी व अमंलदार यांनी घटनास्थळी भेट देवून तेथील वस्तुजन्य पुरावे तसेच तांत्रिक पुरावे गोळा करून संशयीत राज सुरेश महाजन, रा. अडावद ता. चोपडा यास ताब्यात घेतले त्यावर त्यास विचारपुस केली असता तो काहीही सांगत नव्हता शेवटी स्थानिक गुन्हे शाखेतील अधिकारी व अमंलदार यांनी त्यास विश्वासात घेवून विचारपुस केली असता राज महाजन याने सांगीतले की, मयताने तंबाखु खाण्यास न दिल्याने त्यांच्या किरकोळ वादातुन त्याने मयतास वायरने गळा आवळून, लाकडी दाडक्याने मारहण करून, दगडाने ठेचून जिवेठार मारले बाबत सविस्तर हकिगत सांगुन त्याचे सोबत अजुन एक अल्पवयीन बालक असल्याचे सांगीतल्याने त्याला देखील ताब्यात घेवून विचारपुस केली असता त्याने देखील सदर गुन्ह्याची कबुली दिल्याने त्यास देखील ताब्यात अडावद पो.स्टे. CCTNS NO १७९/२०२४ भा.न्या.सं. कलम १०३ (१) या गुन्ह्यात अडावद पो.स्टे.ला ताब्यात देण्यात आले आहे.सदरची कारवाई मा.डॉ.श्री महेश्वर रेड्डी, पोलीस अधीक्षक, जळगाव, मा.श्रीमती कविता नेरकर, अपर पोलीस अधीक्षक, चाळीसगाव, मा.श्री अण्णासाहेब घोलप, उप विभागीय पोलीस अधिकारी चोपडा भाग यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.