क्राईम

जळगांव शहरातील दुचाकी व मोबाईल चोरणा-या दोन आरोपीना जेरबंद करुन दोन दुचाकी व एक मोबाईल जप्त स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

जळगांव शहरात दुचाकी चोरणारे याचा शोध घेऊन कारवाई करणे बाबत मा. पोलीस अधिक्षक श्री. माहेश्र्वर रेड्डी सो, मा. अपर पोलीस अधिक्षक श्री अशोक नखाते सो, यांनी स्थनिक गुन्हे शाखेस सुचना दिल्या वरुन स्थनिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. बबन अव्हाड सो. यांनी स्थनिक गुन्हे शाखेकडील पोलीस अंमलदार याचे पथक तयार केले होते. सदर पथकातील पो.उपनिरी. दत्तात्रय पोटे, सफौ रवि नरवाडे, सफौ संजय हिवरकर, पोहेकॉ संघपाल तायडे, पोहेकॉ मुरलीधर धनगर, पोहेकॉ/हरीलाल पाटील, पो.ना.प्रविण भालेराव याना दुचाकी चोरीचे गुन्हे अघडकीस आणण्या बाबत सुचना दिल्या होत्या.त्या अनुषंगाने दिनांक 01/10/2024 रोजी दुपारी 03/00 वा. सुमारास जळगांव शहरात इसम नामे शोएब अफजलखान पठाण वय 23 रा. खूबचंद साहित्या नविन कॉमप्लेक्स् हुडको पिप्राळा ता.जि. जळगांव व शेख आवेश शेख मोहम्मद वय 21 रा. आझाद नगर, पिप्राळा हुडको हे मोटार सायकल चोरी करीत असल्याबाबत मा. पोलीस निरी बबन आव्हाड यांना माहीती मिळाल्याने पोलीस पथका मार्फत त्याचा शोध घेत असताना पिप्राळा हुडको भागत ते मिळुन आल्याने त्यांना ताब्यात घेऊन त्याचे कडे गुन्हेचे अनषंगाने चौकशी केली असता त्यानी गुन्हाची कबुली दिली. शोएब अफजलखान पठाण याने जळगांव शहारात कोर्ट चौकातुन जुपीटर कंपनीची मोटार सायकल तसेच सुभाष चौक जळगांव येथुन एच.एफ. डिलक्स कंपनीची मोटार सायकल व नेहरुन चौक जळगांव येथुन बजाज कंपनीची प्लॉटीना मोटार सायकल तसेच खोटेनगर भागातुन एका घरातुन दिवसा सॅमसंग गॅलेक्सी कंपनीचा मोबाईल चोरी केली बाबत कबुली दिली आहे. सदरचे चोरी केलेली दोन मोटार सायकल व मोबाईल शेख आवेश शेख मोहम्म्द वय 21 रा.आझाद नगर, पिप्राळा याला विक्री केले बाबत कबुली दिली आहे. एक मोटार सायकल अल्तमेश शे. सलीम रा. पिप्राळा हुडको याला विक्री केले बाबत तपासास निष्पन्न झाले आहे. त्यामुळे दोन मोटार सायकल व एक मोबाईल जप्त करण्यात आले आहे. पुढील तपास जळगांव शहर पोलीस स्टेशनचे पोहेकॉ भास्क्र ठाकरे करीत आहे.आरोपीतांनी वरील 02 मोटार सायकल ह्या जळगांव शहर पोलीस स्टेशन हद्दीतुन, 01 मो.सा., शनिपेठ पोलीस स्टेशन हद्दीतुन व जळगांव तालुका पोलीस स्टेशन हद्दीतुन 01 मोबाईल चोरी केलेले असुन जळगांव शहारातील 04 चोरीचे गुन्हे उघडकीसआले आहे.सदरची कारवाई ही मा. पोलीस अधिक्षक श्री. माहेश्वर रेड्डी सो, मा. अपर पोलीस अधिक्षक श्री अशोकनखाते सो, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. संदीप गावीत सो, याच्या-मार्गदर्शनाखाली मा. पोलीस निरीक्षक श्री. बवन अव्हाड सो. याचे मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!