आव्हाणेचा अभिमान! राकेश चौधरींवर शिवसेनेची मोठी जबाबदारी
जळगाव लोकसभा क्षेत्राचे नवे सोशल मीडिया प्रमुख – राकेश चौधरी!

आव्हाणे (ता. जळगाव) : आव्हाणे ग्रामपंचायतीचे उपसरपंच श्री. राकेश चौधरी यांची शिवसेना (शिंदे गट) पक्षाच्या जळगाव लोकसभा क्षेत्राच्या सोशल मीडिया प्रमुखपदी निवड करण्यात आली आहे. पक्षाच्या डिजिटल मोहीमेचा विस्तार व युवकांशी संवाद साधण्यासाठी ही जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली आहे.
या नियुक्तीची घोषणा राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील, जिल्हाप्रमुख विष्णूभाऊ भंगाळे, महिला आघाडी प्रमुख सरिता ताई कोल्हे तसेच जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
पक्षाच्या डिजिटल प्रचार मोहिमेला गती देणे, तरुण पिढीला सोशल मीडियाच्या माध्यमातून पक्षाशी जोडणे आणि संघटन अधिक बळकट करणे या उद्देशाने श्री. चौधरी यांची निवड करण्यात आल्याचे पक्षाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
या नियुक्तीनंतर आव्हाणे गावासह परिसरात उत्साहाचे व आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, ग्रामस्थ व शिवसेना कार्यकर्त्यांनी श्री. राकेश चौधरी यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले. सोशल मीडियाच्या माध्यमातून पक्षाच्या धोरणांचा प्रसार करण्यासाठी सक्षम नेतृत्व मिळाल्याचा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.
नियुक्तीबद्दल प्रतिक्रिया देताना श्री. राकेश चौधरी म्हणाले की,
“पालकमंत्री गुलाबराव पाटील साहेब, जिल्हाप्रमुख व पक्षातील पदाधिकाऱ्यांनी दाखवलेला विश्वास मी सार्थ ठरविण्याचा प्रयत्न करीन. सोशल मीडियाच्या माध्यमातून पक्ष धोरणे, उपक्रम आणि जनतेशी थेट संवाद अधिक प्रभावी करण्यासाठी मी कटिबद्ध राहीन.”
या नव्या जबाबदारीमुळे आव्हाणे व परिसरातील युवकांमध्ये उत्साह संचारला असून, स्थानिक पातळीवर चौधरी यांच्या नियुक्तीचे मोठ्या प्रमाणावर स्वागत होत आहे.