सरपंच आणि तालुकाप्रमुख एकत्र शिंदे गटात! राजकारणात खळबळ
गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वात मोठं इनकमिंग!

शिरसोली, जळगाव प्रतिनिधी | श्री मराठी न्यूज नेटवर्क
जळगाव तालुक्यातील शिरसोली गावामध्ये आज एक मोठी राजकीय घडामोड घडली आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे तालुकाप्रमुख उमेश रावसाहेब पाटील आणि चिंचोली ग्रामपंचायतीचे सरपंच किरण प्रल्हाद घुगे यांनी थेट शिवसेना – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात जाहीर प्रवेश केला.
पण आजही तितकंच जीवंत! कपिलेश्वर महादेवाचं चमत्कारिक स्थान
हा प्रवेश राज्याचे उपमुख्यमंत्री मा. एकनाथजी शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री जळगांव जिल्हा व जळगावचे लोकप्रिय नेते मा. गुलाबरावजी पाटील यांच्या नेतृत्वाखाली पार पडला.
🔹 या प्रवेशामुळे शिरसोलीसह संपूर्ण जळगाव तालुक्यात राजकीय खळबळ उडाली असून, शिंदे गटाला ग्रामस्तरावर नवसंजीवनी मिळाली आहे.
“मारहाण, मृत्यू आणि खोटं सांगणारे शिक्षक!
🎙️ उमेश पाटील म्हणाले –
“एकनाथ शिंदे साहेबांनी उभा केलेला शिवसेनेचा खरा शिवधर्म आमच्यासारख्या कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचला. आम्ही आता योग्य ठिकाणी आलो आहोत.”
🗣️ सरपंच किरण घुगे यांनी सांगितले –
“गुलाबराव पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली विकासकामांचा झपाटा आहे. ग्रामविकासासाठी आम्हाला हा निर्णय घ्यावा लागला.”
या मोठ्या इनकमिंगनंतर कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. शिरसोली आणि चिंचोली भागात मोठ्या संख्येने समर्थकांनी वाजतगाजत स्वागत करत शक्तीप्रदर्शन केले.