दरोड्याचा गुन्हा उघडकीस; ५ आरोपी व १ विधी संघर्षित बालक नाशिक व अकोला येथून जेरबंद; ₹१,३३,५००/- किंमतीचा मुद्देमाल जप्त.
४ दिवसांत दरोडेखोर जेरबंद! ५ पथकांचा अहोरात्र तपास यशस्वी!

जळगाव/मुक्ताईनगर: दिनांक ०९/१०/२०२५ रोजी रात्री २२:०० ते २३:०० वाजेच्या दरम्यान मुक्ताईनगर व भुसावळ तालुक्यात तीन वेगवेगळ्या पेट्रोलपंपांवर बंदुकीचा धाक दाखवून सशस्त्र दरोडा टाकणाऱ्या पाच आरोपींना आणि एका विधी संघर्षित बालकाला जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने नाशिक आणि अकोला येथून अटक केली आहे. या दरोड्यात चोरलेला एकूण ₹१,३३,५००/- किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
घटनेचा तपशील: दिनांक ०९/१०/२०२५ रोजी रात्री १० ते ११ वाजेच्या सुमारास बोदवड चौफुली, मुक्ताईनगर येथील रक्षा टोफ्युअल (भारत पेट्रोलियम), कर्की फाटा ता. मुक्ताईनगर येथील मनुभाई आशीर्वाद पेट्रोलपंप आणि वरणगाव शिवारातील तळवेल फाटा ता. भुसावळ येथील सय्यद पेट्रालपंप या तीन ठिकाणी पाच ते सहा अनोळखी ईसमांनी मोटारसायकलींवर येऊन बंदुकीचा धाक दाखवून सशस्त्र दरोडा टाकला. दरोडेखोरांनी रोख रक्कम, मोबाईल फोन आणि सीसीटीव्ही डीव्हीआर असा एकूण ₹१,३३,५००/- रु किंमतीचा मुद्देमाल जबरीने चोरून नेला होता. या प्रकरणी मुक्ताईनगर पोलीस स्टेशन येथे गुरनं. ३१६/२०२५ भा. न्या. संहिता कलम ३१०(२) प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला होता.
वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट व तपासाची दिशा: घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन मा. डॉ. महेश्वर रेड्डी, सो. पोलीस अधीक्षक, जळगाव, मा. श्री अशोक नखाते, सो. अपर पोलीस अधीक्षक, जळगाव, व मा. श्री संदीप गावीत, उपविभागीय पोलीस अधिकारी, भुसावळ उपविभाग, यांनी तात्काळ घटनास्थळी भेट दिली. त्यांनी गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेऊन गुन्हा उघडकीस आणण्यासाठी मा. श्री राहुल गायकवाड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव, यांना आदेशित केले.
स्थानिक गुन्हे शाखेची यशस्वी कारवाई: या आदेशानुसार मा. श्री राहुल गायकवाड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव यांनी पोउपनि. शरद बागल, सोपान गोरे, शेखर डोमाळे, जितेंद्र वल्टे, श्रे. पोउपनि. रवी नरवाडे यांच्या नेतृत्वात ५ तपास पथके तयार केली. या पथकांनी अहोरात्र ४ दिवस तांत्रिक माहितीच्या आधारावर आरोपींचा मुक्ताईनगर, वरणगाव ते नाशिकपर्यंत माग काढला.
अटक केलेले आरोपी व मुद्देमाल: पथकांनी आरोपींची ओळख पटवून ०४ आरोपींना नाशिक येथून व ०१ आरोपी व ०१ विधी संघर्षित बालकाला अकोला येथून ताब्यात घेतले. पुढील तपासासाठी त्यांना मुक्ताईनगर पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.
गुन्ह्यात अटक करण्यात आलेले आरोपी:
हस्तगत केलेला मुद्देमाल:
आरोपीची गुन्हेगारी पार्श्वभूमी: अटक आरोपींपैकी सचिन अरविंद भालेराव (वय ३५) याच्यावर भुसावळ बाजारपेठ पो.स्टे. येथे खुनाचा प्रयत्न व दंगा करणे असे ०२ गंभीर गुन्हे दाखल आहेत. विशेष म्हणजे, या आरोपीस सन २०२४ मध्ये महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५५ प्रमाणे २ वर्षांकरीता जळगाव जिल्हयातून हद्दपार (Externed) करण्यात आलेले होते.
कारवाई करणारे पथक: सदरची कार्यवाही ही मा.श्री. डॉ. महेश्वर रेड्डी, सो. पोलीस अधीक्षक, जळगांव, मा. श्री अशोक नखाते, सो, अपर पोलीस अधीक्षक, जळगांव व मा.श्री संदीप गावीत, उपविभागीय पोलीस अधिकारी, भुसावळ, उपविभाग, यांचे मार्गदर्शनाखाली श्री राहुल गायकवाड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पोउपनि, शरद बागल, सोपान गोरे, शेखर डोमाळे, जितेंद्र वल्टे, श्रे. पोउपनि, रवी नरवाडे, पोहेको गोपाळ गव्हाळे, प्रेमचंद सपकाळे, उमाकांत पाटील, सलीम तडवी, श्रीकृष्ण देशमुख, विकास सातदिवे, प्रितमकुमार पाटील, सुनिल दामोदरे, विनोद पाटील, यशवंत टहाकळे, लक्ष्मण पाटील, नितीन बाविस्कर, अक्रम शेख, प्रविण भालेराव, मुरलीधर धनगर, पोना/ किशोर पाटील, पोकों/ईश्वर पाटील,सिध्देश्वर डापकर छगन तायडे, रतनहरी गिते, प्रशात परदेशी, राहुल वानखेडे, राहुल रगडे, सचिन घुगे, मयुर निकम, महेश पाटील, सागर पाटील, भुषण शेलार, , प्रदीप सपकाळे, रविंद्र कापडणे, जितेंद्र पाटील, रविंद्र चौधरी, राहुल महाजन, चालक पोहेकों/दिपक चौधरी, पोहेकों/दर्शन ढाकणे, पोको बाबासाहेब पाटील, प्रमोद ठाकुर, भारत पाटील तसेच पोकों/मिलींद जाधव, गौरव पाटील तसेच बाजारपेठ पोलीस स्टेशन कडील पोहेको/विजय नेरकर, पोकों/योगेश माळी, सचिन चौधरी, महेंद्र पाटील, अमर अढाळे, हर्षल महाजन, प्रशांत सोनार, भुषण चौधरी,प्रवीण चावरे यांनी केली आहे
पुढील तपास मुक्ताईनगर पोलीस स्टेशन करीत आहे.