बातम्या

जळगावात हायटेक बोगस कॉल सेंटरचा भांडाफोड! 31लॅपटॉप जप्त, ८ आरोपी ताब्यात – तपास सुरू!

परदेशी नागरिकांची फसवणूक – ३१ लॅपटॉपसह पोलिसांचा छापा!

जळगाव -(प्रतिनिधी)

जळगाव शहरातील ममुराबाद रोडवरील एल. के. फॉर्म या ठिकाणी परदेशी नागरिकांची ऑनलाइन फसवणूक करणारे हायटेक बोगस कॉल सेंटर कार्यरत असल्याची माहिती मिळाल्यानंतर, पोलिसांनी आज (रविवार, २८ सप्टेंबर) दुपारी धाड टाकत या रॅकेटचा भांडाफोड केला. अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांच्या विशेष पथकाने ही कारवाई केली असून, जागेच्या मालकासह एकूण आठ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार 27 रोजी पोलिसांना माहिती मिळाली की मुमराबाद रोडवरील एलके फार्मर्स वर बोगस कॉल सेंटर सुरू आहे. सदरची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी यांना दिली असता त्या ठिकाणी योग्य ती कारवाई सूचना मिळाल्यानंतर अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते व इतर पोलीस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये आज 28 रोजी दुपारी एल के फार्म हाऊसवर पोलिसांनी धाड टाकली. या धाडीमध्ये एल के फामौस्या एका हॉलमध्ये बोगस कॉल सेंटरचा सेटअप लावलेला मिळून आला. त्या ठिकाणी 31 लॅपटॉप पोलिसांना मिळाले; त्यापैकी दोन ते तीन हे लॅपटॉप सुरू असल्याने सदरील लॅपटॉपच्या माहितीप्रमाणे ॲमेझॉन व इतर कंपन्यांच्या नावे रात्री विदेशातील नागरिकांना कॉल करून त्यांची फसवणूक करून त्यांच्याकडून काही रक्कम ट्रान्सफर केल्याचे दिसून आले आहे.

गुप्त माहितीच्या आधारे धडक कारवाई

शनिवार, दि. २७ सप्टेंबर रोजी अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांना या बोगस कॉल सेंटरबाबत गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानंतर त्यांनी तातडीने हालचाली करून आज दुपारी सुमारे १ वाजण्याच्या सुमारास आपल्या विशेष पथकासह एल. के. फॉर्मवर छापा टाकला.

३१ लॅपटॉपसह कॉल सेंटरचा सेट-अप जप्त

छाप्यामध्ये पोलिसांना ३१ लॅपटॉप, संगणक साहित्य आणि इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणांसह संपूर्ण कॉल सेंटरचा अत्याधुनिक सेट-अप आढळून आला. प्राथमिक चौकशीत उघड झाले की, आरोपी परदेशी नागरिकांना विविध बहाण्यांनी फोन करत असत. स्वतःला ‘अधिकृत एजंट’ भासवून हे लोक डेटा तपासणी, रिफंड प्रक्रिया किंवा आकर्षक योजना दाखवून बळींना जाळ्यात ओढत आणि त्यांच्याकडून पैसे उकळत होते.

आठ जण पोलिसांच्या ताब्यात

छाप्यात पोलिसांनी जागेच्या मालकासह एकूण आठ जणांना ताब्यात घेतले आहे.तर या ठिकाणी पोलिसांनी धाड टाकली असता शहाबाद आलम, निशांत नुरी, शफिक आलम, हासिद रशीद या चार जणांना ताब्यात घेण्यात आलेले आहेत. तसेच फार्म हाऊस वरून नरेश आगरिया, चंदू आगरिया, राकेश आगरिया यांच्यासह मुंबईवरून त्या ठिकाणी जेवण बनवणार असलेला अली गेला सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहे.चौकशीत आरोपींनी कॉल सेंटरमध्ये प्रत्यक्षात २० ते २५ जण काम करत असल्याची कबुली दिली. यातील बहुतांश आरोपी हे राज्याबाहेरील असल्याने हे रॅकेट आंतरराज्यीय स्वरूपाचे असल्याचे स्पष्ट झाले आहे.

तर सदरचे कॉल सेंटर हे मुंबईहून अकबर अली आणि इम्रान यांच्यासह एक जण हँडल करत होता अशी माहिती अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांनी दिली.

  • कॉल सेंटरच्या माध्यमातून विदेशी लोकांना संपर्क साधून वेगवेगळ्या पद्धतीने त्यांना ऑनलाइन पद्धतीने फसविले जात असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

तपासाची दिशा

या प्रकरणात पोलिसांनी जप्त केलेल्या सर्व लॅपटॉप, संगणक, डेटा आणि उपकरणांची तांत्रिक तपासणी सुरू केली आहे. या माध्यमातून नेमकी किती परदेशी नागरिकांची फसवणूक झाली, किती पैसे वसूल करण्यात आले, तसेच या टोळीचे मूळ सूत्रधार कोण आहेत, याचा शोध घेतला जाणार आहे.

पुढील कायदेशीर कारवाई सुरू

ताब्यात घेतलेल्या आरोपींवर विविध गंभीर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, या आंतरराज्यीय रॅकेटच्या जाळ्याचा सखोल तपास पोलिसांकडून केला जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!