रामानंद नगर पोलिसांचे मोठे यश! तब्बल 34 लाख 49 हजारांचा मुद्देमाल हस्तगत – दोन घरफोड्या व एक दुचाकी चोरी उघड

जळगाव :रामानंद नगर पोलिसांनी तब्बल 34 लाख 49 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करत दोन घरफोडी व एक दुचाकी चोरीचा गुन्हा उघडकीस आणला आहे. सोनं-चांदी विक्री करून आरोपी मुद्देमाल लपविण्याच्या तयारीत असतानाच पोलिसांनी कसून तपास करून आरोपींना गजाआड केले.
🔹 गुन्ह्याची पार्श्वभूमी
दि. 01 जून 2025 रोजी फिर्यादी लिलाधर शांताराम खंबायत यांनी फिर्याद दिली होती की, त्यांचे साडू नरेंद्र वाघ हे कामानिमित्त परदेशात गेले असताना 15 मे ते 1 जून या कालावधीत त्यांच्या घराचा दरवाजा तोडून अज्ञात चोरट्यांनी घरातील सोनं-चांदीसह तब्बल 36 लाख 83 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला.
🔹 चोरीस गेलेला मुद्देमाल
- 357 ग्रॅम सोनं (35,70,000/- रुपये किंमत)
- 250 ग्रॅम चांदी (25,000/- रुपये किंमत)
- रोख 85,000/- रुपये
- Dahua कंपनीचा DVR व मॉडेम – 3,000/- रुपये
🔹 पोलिसांचा कसून तपास
मा. पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते व SDPO नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांनी पथकासह कसून तपास सुरू केला.
रात्रगस्तीदरम्यान सपोनि भुषण कोते, पोशि अनिल सोननी, पोशि नितेश बच्छाव व चालक प्रमोद पाटील यांनी दोन संशयितांना पकडले. चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.
🔹 अटक आरोपी
- 1. रवि प्रकाश चव्हाण (21, रा. तांबापुरा, जळगाव)
- 2. शेख शकील शेख रफिक (39, रा. मौलीगंज धुळे, ह.मु. सालार नगर जळगाव)
- 3. जुनेद उर्फ मुस्तकीम भिकन शहा (रा. मच्छीबाजार, तांबापुरा, ह.मु. शिरसोली, जळगाव)
- 4. गुरुदयालसिंग मनजित टाक (रा. शिरसोली नाका, तांबापुरा, जळगाव)
🔹 उघडकीस आलेले गुन्हे
- 1. CCTNS गु.नं. 208/2025, BNS कलम 305(A), 331(3), 331(4)
- 2. CCTNS गु.नं. 286/2025, BNS कलम 305(A), 331(3), 331(4)
- 3. CCTNS गु.नं. 334/2025, BNS कलम 303(2)
🔹 हस्तगत केलेला मुद्देमाल
- 310 ग्रॅम सोनं – 33,79,000/- रुपये किंमतीचे
- 250 ग्रॅम चांदी – 25,000/- रुपये किंमतीचे
- MH-19-BW-9144 अॅक्टीवा दुचाकी – 45,000/- रुपये किंमतीची
- 👉 एकूण 34,49,000/- रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश मिळाले.
🔹 पोलिस पथकाचा सहभाग
या कारवाईत PI राजेंद्र गुंजाळ यांच्या नेतृत्वाखाली सपोनि भुषण कोते, हवालदार जितेंद्र राजपूत, जितेंद्र राठोड, सुशिल चौधरी, सुधाकर अंभोरे, नाईक योगेश बारी, विनोद सुर्यवंशी, अतुल चौधरी, रेवानंद साळुंखे, हेमंत कळसकर, पोशि अनिल सोननी, नितेश बच्छाव, गोविंदा पाटील, दिपक वंजारी व चालक हवालदार प्रमोद पाटील यांचा विशेष सहभाग होता.
रामानंद नगर पोलिसांच्या या कारवाईमुळे दोन घरफोडी व एक दुचाकी चोरीचा पर्दाफाश झाला असून तब्बल 34 लाखांहून अधिक किंमतीचा मुद्देमाल सुरक्षितपणे हस्तगत करण्यात आला आहे. जळगाव पोलिसांच्या दक्षतेमुळे गुन्हेगारीला मोठा आळा बसला आहे. 🚔