पाचोरा पोलिसांची मोठी कारवाई : गावठी पिस्तूलासह सराईत गुन्हेगार जेरबंद!
पोलिसांची मोठी कारवाई – रु. ७३ हजारांचा मुद्देमाल जप्त!

पाचोरा, दि. २२ सप्टेंबर २०२५ : पाचोरा शहरातील गिरणा पंपिंग रोड परिसरात गावठी बनावटीचे पिस्तूल, जिवंत काडतूस आणि मोटारसायकलसह फिरणारा सराईत गुन्हेगार पाचोरा पोलिसांच्या सापळ्यात अडकला आहे. या कारवाईत पोलिसांनी एक गावठी पिस्तूल, एक जिवंत काडतूस, स्टील मॅगझीन व हिरो होंडा मोटारसायकल असा एकूण रु. ७३,०००/- किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव समाधान बळीराम निकम (वय ३७ वर्षे, रा. जाधववाडी, पाचोरा, मूळ रा. अंजाळा, ता. यावल) असे आहे. आरोपीविरुद्ध पाचोरा पोलीस ठाण्यात गु. र. क्र. ४६२/२०२५, शस्त्र अधिनियम कलम ३ व २५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यास अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक श्री. कृष्णा घायाळ करीत आहेत.
🔴 सराईत गुन्हेगार – ८ गंभीर गुन्ह्यांत सामील
सदर आरोपी हा सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध जळगाव जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये एकूण ८ गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्यामध्ये शस्त्र, चोरी, मारहाण, विनयभंग, खूनाचा प्रयत्न यांसारखे गंभीर गुन्हे समाविष्ट आहेत. त्यामुळे आरोपीला अटक होणे ही पोलिसांची मोठी कामगिरी मानली जात आहे.
👮♂️ कारवाईतील अधिकारी व पथक
ही कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री. महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक सौ. कविता नेरकर, व उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. अरुण आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.पोलिस निरीक्षक श्री. राहुलकुमार पवार, पो.उपनिरीक्षक कृष्णा घायाळ, आणि त्यांच्या पथकाने केली.सदर पथकामध्ये स.फौ./२६५८ रणजित पाटील, पो.हे.कॉ./०६२५ राहुल शिंपी, पो.कॉ./१२३० योगेश पाटील, पो.कॉ./१४२२ शरद पाटील, पो.कॉ./३२६३ गणेश कुवर, पो.कॉ/०१३२ श्रीराम शिंपी यांच्यासह स्थानीय गुन्हे शाखेचे पो.हे.कॉ./२१६३ लक्ष्मण पाटील, पो.हे.कॉ./१५२३ राहुल पाटील, पो.कॉ./००८३ जितेंद्र पाटील, पो.कॉ./१६५५ भुषण पाटील यांचा समावेश होता.