
निंभोरा पोलीस स्टेशन तसेच सावदा, यावल, रावेर, मुक्ताईनगर परिसरातील शेतकऱ्यांचे शेती उपयोगाचे साहित्य, तोलकाट्यावर ठेवलेले बॅटरी-इन्व्हर्टर साहित्य व मोटारसायकल चोरीस जाण्याच्या घटना वाढल्याने निंभोरा पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी श्री. हरीदास बोचरे यांनी वरिष्ठांच्या सूचनेनुसार मागील पंधरा दिवसांपासून ताब्यातील पोलिसांच्या मदतीने साकळी पद्धतीने नाकाबंदी, रात्रगस्त करून तांत्रिक व आधुनिक पद्धतीने तपास सुरू केला. मिळालेल्या गुप्त माहितीवरून दिनांक ११ सप्टेंबर रोजी सकाळी सात वाजता संशयित विलास ऊर्फ काल्या सुपडु वाघोदे रा. वडगाव नदीकाठी याचा शोध घेतला असता पोलिस आल्याची चाहूल लागताच तो पसार झाला. त्याचे राहते घर झोपडीत तपासले असता त्याच्यासोबत राहत असलेली महिला योगीता सुनिल कोळी मिळाली व झोपडीतून मोटारसायकल, लहान सोलर प्लेट, नाळी इतर साहित्य मिळाले. चौकशीदरम्यान तिने कबुली दिली की हे साहित्य विलास वाघोदे याने त्याचे शिरसाळा येथील साथीदारांच्या मदतीने चोरी करून वडगाव येथील जमील तडवी यांच्या माध्यमातून निंभोरा येथे राहणाऱ्या स्वप्नील वासुदेव चौधरी याला विकले. त्यानंतर सपोनि बोचरे यांनी निंभोरा पोलिसांच्या मदतीने चोरीचा माल घेणारा मुख्य सूत्रधार स्वप्नील चौधरी यास ताब्यात घेऊन त्याचे घर व गोडावूनची तपासणी केली असता मोठ्या प्रमाणावर चोरी केलेल्या बॅटऱ्या, इन्व्हर्टर मशीन व शेती साहित्य मिळाले. या प्रकरणात चोरी करणारा मुख्य आरोपी विलास ऊर्फ काल्या सुपडु वाघोदे (रा. वडगाव नदीकाठी – फरार) असून त्याचे सहकारी योगीता सुनिल कोळी (रा. तपत कठोरा, ह.मु. वडगाव नदीकाठी), गोपाळ संजय भोलनकर, आकाश मधुकर घोटकर, अर्जुन रतनसिंग सोळंकी (सर्व रा. शिरसाळा ता. बोदवड) आहेत. चोरी केलेला माल ताब्यात ठेवून विल्हेवाट लावणारा आरोपी जमील अब्दुल तडवी (वय ४०, रा. वडगाव) असून चोरीचा माल घेणारे आरोपी स्वप्नील वासुदेव चौधरी (वय ३५, रा. निंभोरा बुगा ता. रावेर), राकेश सुभान तडवी (वय ३२, रा. सावदा ता. रावेर), ललित सुनिल पाटील (रा. निंभोरा बुडा ता. रावेर) व राहुल ऊर्फ मयुर अनिल पाटील (रा. वडगाव ता. रावेर) आहेत. सदर आरोपींकडून पोलिसांनी HTP पंप मटेरीयल सोडण्याचे मशीन ५, मोठ्या साईजच्या बॅटऱ्या ११, लहान बॅटऱ्या ३, इन्व्हर्टर मशीन ७, मोटारसायकली ४, पावर ट्रोलर लहान ट्रॅक्टर २, नॅनो कार १, सोलर प्लेट २, मटेरीयल बॅग ११, ठिबक नळ्या ३ बंडल तसेच इतर शेती व इलेक्ट्रिक साहित्य असा एकूण १२ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करून निंभोरा पोलीस स्टेशनचे ५, यावल पोलीस स्टेशनचे २, रावेर पोलीस स्टेशनचा १, मुक्ताईनगर पोलीस स्टेशनचा १ व सावदा पोलीस स्टेशनचा १ असे एकूण १० गुन्हे उघडकीस आणले. सदर कारवाई मा. पोलीस अधीक्षक डॉ. श्री. महेश्वर रेड्डी (भापोसे), मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. अशोक नखाते, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी फैजपूर विभाग श्री. अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली निंभोरा पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सपोनि हरीदास शिवराम बोचरे यांच्या नेतृत्वाखाली मपोउनि दिपाली पाटील, मपोउनि ममता तडवी, पोहेकॉ सुरेश अढायंगे, पोहेकॉ बिजु जावरे, पोहेकॉ रिजवान पिंजारी, पोना अविनाश पाटील, पोकॉ किरण जाधव, पोकॉ रशिद तडवी, पोकॉ सर्फराज तडवी, पोकॉ रफिक पटेल, पोकॉ अमोल वाघ, पोकॉ प्रभाकर ढसाळ, पोकॉ प्रशांत चौधरी, पोकॉ महेंद्र महाजन, पोकॉ परेश सोनवणे, पोकॉ भुषण सपकाळे, पोकॉ सुभाष शिंदे, चालक पोहेकॉ योगेश चौधरी व पोकॉ राहुल केदारे यांच्यासह महिला पोलीस अंमलदार यांनी केली. तसेच जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे पोउनि सोपान गोरे, पोहेकॉ प्रितम पाटील, पोहेकॉ यशवंत टहाकळे, पोकॉ बबन पाटील, पोकॉ प्रदिप चवरे, पोकॉ प्रदिप सपकाळे, पोकॉ मयुर निकम, पोकॉ सचिन घुगे यांनी भरीव मदत केली. सदर गुन्हे उघडकीस आणून उत्कृष्ठरित्या कामगिरी केल्याने रावेर, यावल, मुक्ताईनगर तालुक्यातील शेतकरी व परिसरातील नागरिकांनी पोलिसांचे मनःपूर्वक कौतुक केले असून जनमानसात सुरक्षेची भावना निर्माण झाली आहे.