गुटखा तस्करांना झटका! जळगाव LCB ची मुक्ताईनगरमध्ये मोठी कारवाई
१ कोटींहून अधिक गुटखा जप्त – दोन जण अटकेत!

जळगाव, दि. ३ सप्टेंबर २०२५ – जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मुक्ताईनगर येथे धडक कारवाई करत महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला गुटखा अवैधरीत्या वाहतूक करणाऱ्या इसमांना रंगेहात पकडले. या कारवाईत वाहनासह तब्बल ₹१,०२,३३,४६०/- किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून आरोपींविरुद्ध मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. राहुल गायकवाड यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, मुक्ताईनगर परिसरात महाराष्ट्रात प्रतिबंधित गुटख्याचा मोठा साठा वाहतूक होणार असल्याची खात्री पटली. त्यानंतर त्यांच्या आदेशानुसार पोलीस उपनिरीक्षक सोपान गोरे यांच्या नेतृत्वाखाली पोहेकाँ सलीम तडवी, पोकाँ छगन तायडे, पोकाँ रतन गिते, पोकाँ मयुर निकम आणि चापोहेकाँ भरत पाटील यांच्या पथकाने तातडीने सापळा रचला.
अन्न व औषध प्रशासन विभागाचे अन्न सुरक्षा अधिकारी व पंच यांच्यासह कार्यवाही करताना सारोळा फाटा येथे नाकाबंदी लावण्यात आली. नाकाबंदी दरम्यान संशयित वाहन ताब्यात घेतले असता वाहनातून मोठ्या प्रमाणात गुटख्याचा साठा आढळून आला. तपासणीदरम्यान हा साठा महाराष्ट्रात विक्रीस बंदी असलेला असल्याचे स्पष्ट झाले.
या कारवाईत जप्त करण्यात आलेल्या गुटख्याची किंमत ₹१,०२,३३,४६०/- इतकी असून, या प्रकरणी खालील आरोपींना अटक करण्यात आली आहे:
-
आशिष राजकुमार जयस्वाल, रा. ग्राम भमोरी, वार्ड क्र. १४, देवास, मध्यप्रदेश
-
आशिफ खान बुल्ला खान, रा. शिवशक्ती नगर, दत्तवाडी, नागपूर
या प्रकरणी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
ही संपूर्ण कारवाई मा. पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. अशोक नखाते, तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या यशस्वी ऑपरेशनमध्ये पोउपनि. सोपान गोरे यांच्यासह पथकातील सर्व पोलिस कर्मचारी यांच्या तत्परतेचे आणि धाडसाचे कौतुक होत आहे.
जप्त मुद्देमाल:
-
गुटखा – ₹१,०२,३३,४६०/-
-
वाहन – तपासाधीन
या कारवाईमुळे जिल्ह्यातील गुटख्याच्या अवैध वाहतूक व विक्रीवर मोठा आळा बसणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.