बातम्या

अमळनेरमध्ये धडाकेबाज पोलिस कारवाई! गावठी पिस्तुलांसह दोघे जेरबंद

अमळनेरमध्ये मोठी धाड – 1.66 लाखांचा मुद्देमाल जप्त!

अमळनेर, दि. 29 ऑगस्ट 2025: अमळनेर शहरातील चोपडा रोड परिसरात अवैधरित्या गावठी बनावटीची पिस्तुले विक्री-खरेदीसाठी आलेल्या दोघांना पोलिसांनी शिताफीने जेरबंद केले. कारवाईत २ गावठी पिस्तुले, ६ जिवंत काडतुसे आणि २ मोटरसायकली असा एकूण ₹1,66,000 किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात गु.क्र. 0352/2025 प्रमाणे शस्त्र अधिनियम कलम 3, 25महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 135 अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे.

कारवाई कशी उलगडली?

  • दि. 28/08/2025 रोजी मा. पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम (अमळनेर पोलीस स्टेशन) यांना गुप्त बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, चोपडा रोडवर गावठी पिस्तुलांची डील होणार आहे.

  • त्यानुसार गुन्हे अन्वेषण पथकातील पो.उप.नि. नामदेव आनंदा बोरकर, पो.ह.क्र.1998 मिलिंद अशोक सोनार, पो.शि.क्र.1870 उदय राजेंद्र बोरसेपो.शि.क्र.1311 निलेश सुभाष मोरे यांच्यासह पथकाने सापळा रचला.

  • संत आसाराम बापू आश्रमासमोर, संशयितांनी पोलिसांना पाहताच पळ काढला; मात्र पथकाने रात्री 10.30 च्या सुमारास दोघांना पकडले.

अमळनेरमध्ये धडाकेबाज पोलिस कारवाई! गावठी पिस्तुलांसह दोघे जेरबंद

जेरबंद आरोपी

  1. विशाल भैय्या सोनवणे (वय 18, रा. ढेकुसिम, ता. अमळनेर)

  2. गोपाल भिमा भिल (वय 30, रा. सत्रासेन, ता. चोपडा, जि. जळगाव)

दोघांची अंगझडती घेतली असता कोणताही परवाना नसताना त्यांच्या ताब्यात खालील मुद्देमाल आढळला—

जप्त मुद्देमाल

  • गावठी बनावटीची 2 पिस्तुले — अंदाजे किंमत ₹60,000

  • जिवंत 6 काडतुसे — अंदाजे किंमत ₹6,000

  • 2 मोटरसायकली — अंदाजे किंमत ₹1,00,000
    एकूण किंमत: ₹1,66,000

गुन्हा नोंद व पुढील तपास

  • सरकारतर्फे फिर्याद पो.शि.क्र. 2826 विनोद किरण संदानशिव (नेमणूक: अमळनेर पोलीस स्टेशन) यांनी दिली.

  • दि. 29/08/2025 रोजी वरील कलमांन्वये गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास पो.उप.नि. नामदेव आनंदा बोरकर करीत आहेत.

वरिष्ठांचे मार्गदर्शन

ही कारवाई मा. पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, मा. अपर पोलीस अधीक्षक सौ. कविता नेरकर (चाळीसगाव परिमंडळ) आणि मा. उपविभागीय पोलीस अधिकारी अमळनेर श्री. विनायक कोते यांच्या सूचनांनुसार अमळनेर पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने केली.

कडक बंदोबस्त

गणेशोत्सव सुरू असून आगामी ईद-ए-मिलाद आणि इतर सण पार्श्वभूमीवर मा. जिल्हाधिकारी, जळगाव यांनी तलवारी, अग्निशस्त्रे व प्राणघातक हत्यारे बाळगणे/जमावात घेऊन फिरणे यावर प्रतिबंध लागू केला आहे.

आवाहन: “कोणीही इसम अवैध शस्त्रे बाळगत असल्याची माहिती तात्काळ पोलिसांना कळवावी; बातमीदाराचे नाव गोपनीय राखण्यात येईल,” असे मा. पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!