बांधकाम कामगारांसाठी खुशखबर! गृहोपयोगी संच वाटपाची नवी सोय सुरू

जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील नोंदणीकृत सक्रिय बांधकाम कामगार बंधू-भगिनींसाठी गृहोपयोगी संच मिळवण्याची प्रक्रिया आता अधिक सोपी करण्यात आली आहे.
आता कामगारांना गृहोपयोगी संच मिळवण्यासाठी रांगेत उभं राहण्याची गरज नाही. यासाठी घरबसल्या ऑनलाईन अपॉइंटमेंट घेण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. इच्छुकांनी http://hikit.mahabocw.in/appointment या वेबसाईटवर जाऊन आपल्या सोयीप्रमाणे तारीख निवडून अपॉइंटमेंट बुक करावी.
जळगाव आणि धरणगाव तालुक्यातील सर्व कामगारांनी अपॉइंटमेंट बुक करताना फक्त धरणगाव किंवा जळगाव ग्रामीण सेंटरची निवड करणे आवश्यक आहे.
२५ ऑगस्टपासून गृहोपयोगी संच वाटपास सुरुवात
२५ ऑगस्टपासून गृहोपयोगी संचाचे वाटप सुरु होणार असून, ज्यांनी ऑनलाईन अपॉइंटमेंट घेतलेली असेल, त्यांनी निवडलेल्या तारखेला आवश्यक कागदपत्रांसह संबंधित सेंटरवर उपस्थित राहावे.
आवश्यक कागदपत्रे:
- आधार कार्ड
- बांधकाम मंडळाचे कार्ड
- एक रुपयाची नोंदणी पावती
- ऑनलाईन अपॉइंटमेंट लेटर
- स्वयंघोषणा पत्र
कामगारांनी दिलेल्या सेंटरवर जाऊन बायोमेट्रिक ओळख व ऑनलाईन फोटो नोंदणी पूर्ण केल्यानंतर त्यांना गृहोपयोगी संच दिला जाणार आहे.
गृहोपयोगी संच वाटपाची केंद्रे:
1. बिलखेडे-वावडदे, ता. जळगाव
2. कमल जिनिंग, चोपडा रोड, धरणगाव
प्रशासनाकडून आवाहन करण्यात आले आहे की, तुमच्या सोयीसाठी धरणगाव व जळगाव ग्रामीण सेंटरच निवडा, जेणेकरून संच मिळवताना कोणताही अडथळा येणार नाही.