रिधुरमध्ये रात्री अनोळखी महिला फिरताना दिसली; जनार्धनआप्पा सपकाळेंनी तत्काळ मदतीचा धाव घेतला

जळगाव श्री मराठी न्यूज । जळगाव ग्रामीण | जळगाव ग्रामीण मतदारसंघातील रिधुर गावात बुधवारी रात्री उशिरा एक अनोळखी महिला रस्त्यावर भटकताना ग्रामस्थांना दिसून आली. पाहता येत होते की तिच्या वर्तनात काही मानसिक अस्वस्थतेची चिन्हे जाणवत होती. त्यामुळे परिसरात काही काळ गोंधळ निर्माण झाला.रम्यान, रात्री अंदाजे १ वाजता ही माहिती जळगाव जिल्ह्यातील जळगाव ग्रामीण मतदारसंघाचे पं. समिती सभापती जनार्धनआप्पा सपकाळे यांच्यापर्यंत पोहोचली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.
महिलेची स्थिती पाहून त्यांनी त्वरित 108 आपत्कालीन सेवा क्रमांकावर संपर्क साधला. त्यानंतर ॲम्बुलन्स गावात दाखल झाली व संबंधित महिलेला सुरक्षितरीत्या जळगाव सिव्हिल हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले.या प्रसंगामुळे गावकऱ्यांनी सुटकेचा नि:श्वास टाकला असून, उशिरा रात्री तत्परतेने मदत करणाऱ्या जनार्धनआप्पा सपकाळे यांच्या कार्याचे ग्रामस्थांनी विशेष कौतुक केले आहे.