राज्यसभेत जळगावचा मान – ॲड. उज्ज्वल निकम यांचा भव्य सत्कार!

जळगाव, दि. १२ ऑगस्ट –
देशातील अनेक गाजलेल्या गुन्हेगारी प्रकरणांमध्ये विशेष सरकारी वकील म्हणून यशस्वी कामगिरी बजावून न्यायव्यवस्थेत आपला ठसा उमटवणारे ज्येष्ठ विधीज्ञ ॲड. उज्ज्वल जी. निकम यांची नुकतीच राज्यसभेवर निवड झाल्याबद्दल जळगाव येथे त्यांचा भव्य सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी शिवसेना (एकनाथ शिंदे गट) उपजिल्हाप्रमुख स्वप्नील अशोक परदेशी यांनी खास पेंटिंग फ्रेम भेट देऊन ॲड. निकम यांचा सत्कार केला. ॲड. निकम यांच्या राज्यसभेवरील निवडीमुळे जिल्ह्याचा सन्मान वाढला असून, त्यांच्या कार्यातून तरुण पिढीला प्रेरणा मिळत असल्याचे मत स्वप्नील परदेशी यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाला भाजप जिल्हा उपाध्यक्ष रोहित दादा निकम, जिल्हा सहकार दूध उत्पादक संघाचे संचालक रमेश आप्पा पाटील, तसेच शिवसेना (शिंदे गट) तालुका प्रमुख शिवराज भाऊ पाटील यांची विशेष उपस्थिती होती. मान्यवरांनी ॲड. निकम यांच्या कायदेक्षेत्रातील योगदानाचा गौरव करत, त्यांच्या राज्यसभेतील कार्यकाळातून जनतेचे प्रश्न प्रभावीपणे मांडले जातील, असा विश्वास व्यक्त केला.
सत्कार कार्यक्रमात ॲड. निकम यांनी उपस्थितांचे मनःपूर्वक आभार मानत, देशहितासाठी आणि जनतेच्या कल्याणासाठी नेहमीच कार्यरत राहण्याची ग्वाही दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन स्थानिक कार्यकर्त्यांनी केले.