बातम्या

जळगाव जिल्हापरिषद निवडणुकीत पुन्हा प्रतापराव पाटील मैदानात! दिवाळीनंतर निवडणुकीचा बिगुल

"दिवाळीनंतर सुरू होणाऱ्या जिल्हापरिषद निवडणुकीत माजी सदस्यांच्या हालचालींना वेग – गावातील नागरिकांशी संवाद, विकास कामांची पाहणी सुरू"

जळगाव,श्री मराठी न्युज  दि. ९ ऑगस्ट – जळगाव जिल्ह्यातील जिल्हा परिषद निवडणुकीची रणधुमाळी लवकरच सुरू होणार आहे. या पार्श्वभूमीवर जनतेच्या मनावर अधिराज्य गाजवणारे, विकासाचा ठसा उमटवणारे माजी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव गुलाबराव पाटील यांनी पुन्हा एकदा निवडणुकीच्या मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. दिवाळीनंतर निवडणुकीचा बिगुल वाजताच प्रतापराव पाटील आपल्या गटातून उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची माहिती समोर आली आहे.

विकासकामात आघाडी, साधेपणा आणि जनतेशी घट्ट नातं ही त्यांची खरी ताकद मानली जाते.गेल्या कार्यकाळात प्रतापराव पाटील यांनी रस्ते बांधकाम, पाणीपुरवठा योजना, शैक्षणिक सुविधा वाढवणे, शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर ठाम भूमिका घेणे अशा अनेक विकासकामांमुळे जनतेचा लाडका नेता म्हणून ओळख निर्माण केली. “काम बोलतं” हा त्यांचा कार्यपद्धतीचा मूलमंत्र राहिला आहे.

प्रतापराव पाटील हे जळगाव जिल्ह्याचे सध्याचे पालकमंत्री आणि महाराष्ट्र राज्य पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री नामदार गुलाबराव पाटील यांचे चिरंजीव असून, सूनही त्यांच्या वागणुकीत अजिबात अहंकार नाही. मंत्रीपुत्र असूनही ते जनतेत मिसळून, जमिनीवर राहून काम करणारे कार्यकर्त्यांचे नेता म्हणून ओळखले जातात. तसेच वडिलांच्या मार्गदर्शनाखाली आणि विचारांचा वारसा पुढे नेत ते जनतेच्या हक्कासाठी झटणारे, युवकांचे प्रेरणास्थान बनले आहेत. सध्या ते गावोगावी संपर्क दौऱ्यावर असून, नागरिकांशी प्रत्यक्ष भेटीगाठी घेत आहेत. अनेक गावांमध्ये त्यांच्या स्वागतासाठी फटाके, पुष्पगुच्छ, जल्लोष, उद्घाटने यांची रेलचेल दिसून येत आहे. या दौऱ्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण आहे.

पहिल्यांदा जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आलेल्या प्रतापराव पाटील यांनी कोणत्याही जाती, धर्म, पक्षाचा भेदभाव न करता, सर्वसामान्य जनतेचे प्रश्न निस्वार्थ भावनेने सोडवले. राजकीय आकस बाजूला ठेवत लोकांशी आपलेपणाने वागणं हीच त्यांची खरी ओळख आहे. सामाजिक, धार्मिक आणि वैद्यकीय क्षेत्रातही त्यांचे योगदान लक्षणीय आहे पनवेल येथे मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिरे (GPS मित्र परिवाराच्या सहकार्याने) ,गरजूंना तात्काळ रेशन कार्ड, शासन योजना व आरोग्य सुविधा उपलब्ध करून देणे,सरकारी दवाखान्यांमध्ये सुविधा उभारणे,वृद्ध, निराधारांचे पगार वेळेत सुरू करून घेणे,गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, वारी, कीर्तन सोहळ्यांत सक्रिय सहभाग.

पालकमंत्री गुलाबराव पाटील अधिवेशनाच्या कामात व्यस्त असताना, प्रतापराव पाटील आणि त्यांचे भाऊ विक्की बाबा यांनी मतदारसंघात जनतेला त्यांच्या अनुपस्थितीची जाणीव होऊ दिली नाही. कोणत्याही गाजावाजाविना प्रत्येक कामात प्रत्यक्ष सहभागी होणं ही त्यांची कार्यशैली लोकांच्या मनात घर करून गेली आहे.,आणि “प्रतापराव पाटील यांच्यासारखं संवेदनशील, नेहमी सर्वसामान्यांच्या पाठीशी उभं राहणारं नेतृत्व दुर्मिळ आहे. जिल्हा परिषद सदस्य असताना जितकं काम केलं, त्याहीपेक्षा नंतर अधिक प्रभावीपणे जनतेसाठी लढले. त्यामुळेच आम्ही ‘We Want Z.P. प्रतापराव पाटील’ असा आवाज बुलंद करतो.”

अनेक गावांमध्ये विविध विकासकामांचे उद्घाटन कार्यक्रम देखील करत आहेत. रस्ते, पाणीपुरवठा, शैक्षणिक सुविधा आणि सामाजिक उपक्रमांच्या शुभारंभासाठी ते स्वतः उपस्थित राहून नागरिकांशी संवाद साधतात. त्यामुळे त्यांच्या नेतृत्वाविषयी नागरिकांमध्ये विश्वास अधिकच दृढ झाला आहे.आज इतक्या मोठ्या मंत्र्यांचा पुत्र, माजी जि.प. सदस्य असूनही असा साधेपणा आणि जनतेत मिसळण्याची वृत्ती दुर्मिळ आहे. हा नेता फक्त प्रचारापुरता नाही, तर लोकांमध्ये राहून लोकांसाठी काम करणारा आहे.”

आज जळगाव ग्रामीण मतदारसंघात प्रत्येक सामान्य नागरिक, कार्यकर्ता एकच घोषणा करत आहे —
“We Want Z.P. प्रतापराव पाटील!” ही केवळ कार्यकर्त्यांची इच्छा नाही, तर हा संपूर्ण जनतेचा आवाज आहे.साधेपण, लोकांशी जोडलेलं नातं, आणि कधीही कुठेही मोठेपणा न दाखवता जनतेच्या सेवेसाठी तत्पर राहणं — हीच प्रतापराव पाटील यांची खरी ताकद आहे. आगामी निवडणुकीत ते पुन्हा एकदा दमदार विजय मिळवतील, असा विश्वास जनतेला आहे.

Prataprao Gulabraoji Patil (@pratapraogulabraojipatil) • Instagram photos and videos

Prataprao Gulabraoji Patil (@pratapraogulabraojipatil) • Instagram photos and videosPrataprao Gulabraoji Patil (@pratapraogulabraojipatil) • Instagram photos and videos

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!