गुलाबराव पाटलांनी दिली दृष्टी! अभूतपूर्व गर्दी!1510 रुग्णांची तपासणी! मोतिबिंदू मोफत ऑपरेशन!

पाळधी (विशेष प्रतिनिधी)
मा. ना. गुलाबराव पाटील साहेब यांच्या प्रेरणेतून आणि जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील व विक्रम पाटील यांच्या अथक प्रयत्नातून जिपीएस मित्र परिवार तर्फे आयोजित भव्य नेत्र तपासणी व मोफत मोतिबिंदू ऑपरेशन शिबिराला आज अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला.
आजवरच्या सर्व शिबिरांचे विक्रम मोडणारे हे शिबिर ठरले असून, सकाळी ७ वाजताच गावागावांमधून नागरिकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली. आबालवृद्ध नागरिकांनी दृष्टी तपासणीसाठी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. सगळ्यांची अगोदर नोंदणी करून शिस्तबद्ध रीतीने तपासणी करण्यात आली.
🔹 एकूण नोंदणी – १५१० रुग्ण
🔹 पनवेल येथील सुप्रसिद्ध शंकरा नेत्र रुग्णालयात – २१० रुग्ण रवाना
🔹 रविवारी उर्वरित २४० रुग्णांची पाठवणी (११ ऑगस्ट)
शिबिरात उपस्थित रुग्णांसाठी नाश्ता व जेवणाची उत्तम सोय करण्यात आली होती. सर्व सेवा पूर्णपणे मोफत उपलब्ध करून देण्यात आल्या असून, रुग्णांकडून कोणताही मोबदला न घेण्याचे नियोजन करण्यात आले. या सेवाभावी उपक्रमासाठी गुलाबराव पाटील, प्रतापराव पाटील व विक्रम पाटील हे नेहमीच कार्यरत आहेत. त्यांच्या दृष्टीदान संकल्पनेचे सर्वत्र कौतुक होत असून, प्रत्येक रुग्णाने मनापासून आभार व्यक्त केले.
🕉️ “जीवनात ही घडी अशीच राहू दे, आणि आमच्या लाडके नेते गुलाबराव पाटील, प्रतापराव पाटील, विकी बाबा यांच्या कडून अशीच दृष्टीदानाची सेवा होऊ दे,” अशी साकडं रुग्ण व ग्रामस्थ पांडुरंगाच्या चरणी घालत आहेत.
👩⚕️👨⚕️ शिबिरासाठी पुढील वैद्यकीय पथकाने घेतली अपार मेहनत:
-
शंकरा नेत्र रुग्णालयाची पूर्ण टीम
-
तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय चव्हाण
-
डॉ. चंदन चौधरी, डॉ. प्रशांत कोळी, डॉ. भूपेंद्र वाघ
-
डॉ. संदीप पाटील, डॉ. प्रीती पाटील, डॉ. सायमा खान
-
डॉ. निळोफर शेख, डॉ. राहुल चौधरी
-
अतुल नानवरे, मेश्राम मॅडम
-
पाळधी आरोग्य केंद्राचे सर्व कर्मचारी
यासोबत जिपीएस मित्र परिवार, शिवसेना, युवासेना यांनी संयोजन, व्यवस्थापन आणि सेवा देण्यासाठी अविरत परिश्रम घेतले.
🕊️ “पाणी वाला बाबा” नंतर आता “दृष्टी देणारा बाबा!”
गुलाबराव पाटील साहेबांची “पाणी वाला बाबा” म्हणून ओळख महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहेच. पण आता या सेवाभावी दृष्टीदान मोहिमेमुळे “दृष्टी देणारा बाबा” म्हणून एक नवी ओळख निर्माण होत आहे.
ही सेवा केवळ एक आरोग्य उपक्रम नसून, एक सामाजिक आंदोलन आहे, ज्यामुळे हजारो नागरिकांचे आयुष्य उजळले आहे.
📝 संपर्क
जिपीएस मित्र परिवार, पाळधी
अधिक माहितीसाठी संपर्क करा.