प्रतापराव पाटील यांच्या हस्ते भांड्यांचे वाटप, कंडारीत उत्साहाचे वातावरण

कंडारी येथे महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ (MAHABOCW) मार्फत बांधकाम क्षेत्रात कार्यरत कामगारांना जीवनावश्यक भांड्यांचे वाटप करण्यात आले. हा उपक्रम पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री मा. गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात आला.
उपस्थित लाभार्थी बांधकाम कामगारांना त्यांच्या कुटुंबासाठी भांडी संचाचे वाटप करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव गुलाबराव पाटील यांच्या हस्ते हा लाभ वितरित करण्यात आला.
कार्यक्रम प्रसंगी तालुकाप्रमुख शिवराज पाटील, नंदकिशोर देशमुख, हर्षल भाऊ बाविस्कर, संजय भाऊ देशमुख, शैलेश दादा पवार, सुशीर सुर्वे, प्रकाश जाधव, संदीप धनगर, किशोर जाधव, राहुल धनगर, बाळू धनगर, प्रवीण धनगर, निखिल शिंदे, रंजन परदेशी, विशाल मराठे तसेच बबलू सोनवणे यांची उपस्थिती उल्लेखनीय ठरली.
कार्यक्रमाचे आयोजन अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने करण्यात आले होते. बांधकाम कामगारांनी या उपक्रमाचे स्वागत करत मंत्री गुलाबराव पाटील यांच्या सहृदयतेबद्दल आभार व्यक्त केले. कामगार कल्याणासाठी यापुढेही असे उपक्रम राबवावे, अशी अपेक्षा उपस्थितांनी व्यक्त केली.