जळगाव LCB ची मोठी कारवाई, एकाच दिवसात ४ गंभीर गुन्हे उघडकीस!

जळगाव जिल्हा स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कामगिरी : एकाच दिवसात ४ गंभीर गुन्हे उघडकीस, १३ लाखांचा मुद्देमाल जप्त
जळगाव जिल्हा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने एकाच दिवसात ४ गंभीर गुन्ह्यांचा छडा लावून जिल्ह्यात मोठी कामगिरी केली आहे. चाळीसगाव येथील खून, रिक्षा चोरी, पाचोरा व भुसावळ येथील दुचाकी चोरी, साकेगाव येथील ट्रॅक्टर चोरी आणि जळगाव शहरातील सिगारेट चोरी प्रकरणाचा पर्दाफाश करण्यात आला आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी पत्रकार परिषद घेऊन यासंदर्भात माहिती दिली.
CTV मध्ये कैद! पुण्यातील चोरट्यांची टोळी
5 लाखांपर्यंत मोफत उपचार मिळवा
चोरीच्या ५ प्रवासी रिक्षा हस्तगत
जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोउनि. शरद बागल, पोउनि. सोपान गोरे, सफौ. अतुल वंजारी, पोहेकॉ. सुनिल दामोदरे, अक्रम शेख, नितीन बाविस्कर, प्रविण भालेराव, विजय पाटील, पोकॉ. किशोर पाटील, रविंद्र कापडणे, चापोकॉ. महेश सोमवंशी यांच्या पथकाने रिक्षा चोरीचा गुन्हा उघड केला. चाळीसगाव आणि नाशिक रोड पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यांमध्ये सादिक अली सैय्यद अली (वय ४०, रा. पिंप्राळा हुडको, जळगाव) आणि विधी संघर्ष बालक यांच्याकडून दोन प्रवासी रिक्षा जप्त करण्यात आल्या.
पुढील तपासात पिंप्राळा हुडको परिसरात वेगवेगळ्या चेसिस, इंजिन आणि आरटीओ नंबरच्या तीन रिक्षा वापरत असल्याचे उघड झाले. यांची कागदपत्रे नसल्याने त्या तीनही रिक्षा देखील हस्तगत करण्यात आल्या.
जंगलात मिळाला महिलेला मृत्यूचा आहेर! पारोळा खुनाचा थरार उलगडला!
रात्री गस्तीत ट्रॅक्टर चोर पकडला
भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात ट्रॅक्टर चोरीचा गुन्हा दि. १ जुलै रोजी दाखल झाला होता. तपासादरम्यान रात्र गस्त करणाऱ्या श्रेपोउनि. रवी नरवाडे, पोहेकॉ. गोपाळ गव्हाळे, पोहेकॉ. संदीप चव्हाण यांच्या पथकाने संशयास्पद अवस्थेत एक निळ्या रंगाचे ट्रॅक्टर नेत असलेला इसम पकडला. विचारणा केली असता त्याने स्वत:चे नाव अनिकेत संतोष पाटील (रा. साकेगाव) असे सांगून, हे ट्रॅक्टर साकेगाव येथून चोरी करून विक्रीसाठी नेत असल्याची कबुली दिली. त्याच्याकडून चोरीचे ट्रॅक्टर जप्त करण्यात आले.
दाखले वाटप थांबवण्यासाठी धमक्या!
धुळेचा अट्टल चोरटा जाळ्यात
भडगाव शहरात मोटारसायकल चोरी करणारा शेख इमरान शेख रफिक (रा. भडगाव) आणि त्याचा साथीदार शेख अकिल शेख रफिक (रा. जलाली मोहल्ला, भडगाव) यांना एलसीबीच्या पथकाने पकडले. त्यांनी भडगाव आणि धुळे येथून ३ मोटारसायकल चोरी केल्याची कबुली दिली. आरोपी शेख इमरान शेख रफिक याच्यावर पूर्वी खुनाचा गुन्हा, खुनाचा प्रयत्न आणि ४ घरफोडीचे गुन्हे दाखल असल्याचे समोर आले.
चोरीची दुचाकी जप्त
वरणगाव पोलीस ठाण्यात दाखल दुचाकी चोरी प्रकरणाचा तपास करताना समीर शेख अयुब शेख (रा. मुस्लीम कॉलनी, भुसावळ) याच्याकडून चोरीची मोटारसायकल जप्त करण्यात आली. गुप्त बातमीदाराच्या माहितीवरून त्याच्या घरी शोध घेतला असता घरासमोरच चोरीची दुचाकी मिळून आली.
सिगारेट चोरट्यांचा पुण्याहून शोध
२७ जून रोजी जळगाव शहरातील गोंविदा रिक्षा स्टॉप येथे उभ्या असलेल्या महेंद्र पिकअपमधून ४ लाख २ हजार ७५ रुपयांच्या सिगारेट चोरीचा गुन्हा दाखल झाला होता. एलसीबीच्या पथकाने घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे संशयित सागर राजू घोडके (रा. विद्यानगर झोपडपट्टी, चिंचवड, पुणे) याला पुण्यातून पकडले.
त्याच्या चौकशीत त्याने साथीदार अभिजित ऊर्फ कुबडया विटकर, काशिद अन्सारी आणि आकाश ऊर्फ बंटी राजपूत यांच्यासह ही चोरी केल्याचे मान्य केले. चोरी केलेल्या सिगारेट्स स्थानिक नागरिकांना विकल्याची माहिती दिली. पोलिसांनी त्यांच्या अंगझडतीतून ३ लाख रुपये रोख जप्त केले.
ब्रेकिंग;शाळा बंद, विद्यार्थी रडत होते… पण जिल्हा प्रशासन बनले संकटमोचक!
दुसरे ट्रॅक्टर जळगावात हस्तगत
अमळनेर पोलीस ठाण्यात ट्रॅक्टर चोरीचा गुन्हा दाखल होता. तपासादरम्यान जळगाव शहरातील नेरी नाका स्मशानभूमीजवळ हे ट्रॅक्टर सोडून दिले असल्याचे लक्षात आले. पथकाने ट्रॅक्टर जप्त केले असून अज्ञात आरोपींचा शोध सुरू आहे.
३ दिवसांत ९ वाहन चोरीचे गुन्हे उघड
जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अवघ्या ३ दिवसांत ९ वाहन चोरीचे गुन्हे उघड करत तब्बल १३ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या नेतृत्वाखालील पथकाने केली आहे.
ही कामगिरी जळगाव पोलिसांची तत्परता आणि तांत्रिक कौशल्य सिद्ध करणारी आहे. जिल्ह्यातील गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेने उचललेले हे महत्त्वाचे पाऊल आहे.