जळगाव मध्ये आकाशातून पडला १६ किलोचा धातूचा तुकडा; खळबळ

जळगाव/प्रतिनिधी (दि. ४ जुलै २०२५):
जळगाव शहरातील एमआयडीसी औद्योगिक वसाहतीत आज सायंकाळी एक अत्यंत अनोखी आणि धक्कादायक घटना घडली आहे. अनुपमा इंडस्ट्रीज, S-10, एमआयडीसी जळगाव या फॅक्टरीच्या भिंतीवर अचानक आकाशातून एक मोठा धातूचा तुकडा येऊन आदळला. हा तुकडा जवळपास १६ किलो वजनाचा असल्याची माहिती मिळाली आहे.
1159 ग्रामपंचायतींमध्ये मोठा आरोग्य उपक्रम!
ही घटना घडली त्यावेळी परिसरात मोठा आवाज झाला आणि परिसरातील लोकांमध्ये घबराट पसरली. याबाबतची माहिती मिळताच जळगावचे प्रांताधिकारी विनय गोसावी, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी (DDMO) आणि MIDC पोलीस स्टेशनचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनास्थळी जाऊन संपूर्ण परिस्थितीची पाहणी केली. पोलिसांनी तातडीने त्या धातूच्या तुकड्याला ताब्यात घेतले असून, तो सध्या MIDC पोलिस ठाण्यात ठेवण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती देताना MIDC पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांनी सांगितले की, “हा तुकडा नेमका कुठून आला आहे, तो कोणत्या धातूचा आहे, याचा सध्या तपास सुरू आहे. प्राथमिक अंदाजानुसार हा तुकडा आकाशातून पडलेला असावा, मात्र तो कोणत्या यंत्राचा किंवा उपग्रहाचा भाग आहे का, याची खात्री करण्यासाठी तांत्रिक तपास केला जाणार आहे.”
कट्टा घेऊन फिरणारा तरुण अखेर गजाआड
या घटनेमुळे जळगाव शहरात मोठी चर्चा सुरु झाली असून, अनेक नागरिकांनी ही बाब सोशल मीडियावर देखील शेअर केली आहे. काही नागरिकांनी हा तुकडा उपग्रहाचा भाग असण्याची शक्यता व्यक्त केली आहे, तर काहींनी आंतरिक्षातील कुठल्यातरी भागाचा असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे.
प्रशासनाने नागरिकांना घाबरून न जाण्याचे आवाहन केले असून, तपास पूर्ण होईपर्यंत संयम बाळगावा असे सांगितले आहे. या घटनेचा पुढील तपास सुरु असून लवकरच याबाबत अधिकृत माहिती मिळेल, असे प्रशासनाने सांगितले आहे.
One Comment