बातम्या

अपघाताचा बनाव रचून जीवे मारण्याचा प्रयत्न; LCBच्या तपासात तिघे आरोपी निष्पन्न, अटक

एरंडोल पोलीस स्टेशन येथे CCTNS गुन्हा क्रमांक ९६/२०२५, भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम २८१ व इतर संबंधित कलमांनुसार दाखल गुन्ह्याच्या अनुषंगाने, माजी नगरसेविका कल्पना दशरथ महाजन (वय ४१ वर्ष, व्यवसाय माजी नगरसेविका, न.प. एरंडोल, महात्मा फुले पुतळ्याजवळ, एरंडोल) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दिनांक १४/०६/२०२५ रोजी एरंडोल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सदर गुन्ह्यातील जखमी दशरथ बुधा महाजन हे नगरपरिषद एरंडोल येथे माजी उपनगराध्यक्ष होते. त्यांचे एरंडोल शहरातील अनेक राजकीय व्यक्तींशी मतभेद असल्याची माहिती असून, फिर्यादी व त्यांच्या नातेवाईकांनी सदर प्रकार हा अपघात नसून घातपात असल्याचा संशय व्यक्त केला होता.

या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून मा. डॉ. श्री. महेश्वर रेड्डी (पोलीस अधीक्षक, जळगाव) यांनी सदर गुन्हा पुढील तपासासाठी स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव यांच्याकडे वर्ग केला. त्यानुसार, श्री. संदीप पाटील (वरिष्ठ पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव) यांच्या नेतृत्वाखाली दोन तपास पथकांची स्थापना करण्यात आली.

तपास पथकाने घटनास्थळाची बारकाईने पाहणी केली आणि त्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम सुरू केले. मात्र, घटना घडली त्यावेळी आलेल्या वादळ व पावसामुळे वीजपुरवठा खंडित झाला होता, त्यामुळे अनेक ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज मिळवणे शक्य नव्हते. तरीदेखील, प्रामाणिक आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांनंतर पोलीस नाईक प्रविण मांडोळे व राहुल कोळी यांनी आठ तासांच्या अथक तपासात एका पेट्रोल पंपावरील सीसीटीव्ही फुटेज प्राप्त केले. या फुटेजच्या मदतीने आरोपींची ओळख पटली.

तपासाअंती आरोपी म्हणून निष्पन्न झालेले इसम:

1. उमेश ऊर्फ बदक सुरेश सुतार (वय ४० वर्ष)

2. शुभम कैलास महाजन (वय १९ वर्ष)

3. पवन कैलास महाजन (वय २० वर्ष)

सर्वजण रा. एरंडोल, ता. एरंडोल, जि. जळगाव

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपींना शिताफीने ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली. आरोपी उमेश ऊर्फ बदक सुरेश सुतार याने वैयक्तिक वैमनस्यातून हा गुन्हा केल्याचे कबूल केले. गुन्हा करताना वापरलेली महिंद्रा अ‍ॅन्ड महिंद्रा कंपनीची बोलेरो चारचाकी वाहनसुद्धा आरोपी उमेश सुतार याच्याकडून जप्त करण्यात आले आहे.

सदर गुन्ह्यातील तिन्ही आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांना मा. न्यायालयासमोर हजर करण्यात आले आहे. या गुन्ह्यात आणखी कुणाचा सहभाग आहे काय? याचा तपास पोलीस सखोलपणे करत आहेत.

ही संपूर्ण कारवाई खालील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली:

मा. डॉ. श्री. महेश्वर रेड्डी (पोलीस अधीक्षक, जळगाव ) मा. श्रीमती कविता नेरकर (अपर पोलीस अधीक्षक, चाळीसगाव)मा. श्री. विनायक कोते (उपविभागीय पोलीस अधिकारी, अमळनेर)

 

या कारवाईत पुढील अधिकारी व कर्मचारी सहभागी होते:

श्री. संदीप पाटील (वरिष्ठ पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव)श्री. निलेश गायकवाड (पोलीस निरीक्षक, एरंडोल पोलीस स्टेशन पोलीस उपनिरीक्षक शरद बागल, सोपान गोरे पोलीस हवालदार हरीलाल पाटील, संदीप पाटील, प्रविण मांडोळे, अक्रम शेख, प्रविण भालेराव, रवि कापडणे, राहुल कोळी, जितेंद्र पाटील, भूषण पाटील (स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव) पो. नि. प्रशांत पाटील (एरंडोल पोलीस स्टेशन)

या संयुक्त तपास कार्यामुळे एक मोठा घातपात टळला असून, राजकीय वैमनस्यातून घडवून आणलेला हा बनावट अपघाताचा प्रकार उघडकीस आला आहे.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!