बातम्या

“वारकऱ्यांचा खरा सेवक… पंढरपूर वारीत लोकसेवकाचा प्रत्यक्ष अनुभव” – लेखन : धनराज कासट, पाळधी

🌿 नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला पंढरपूर वारीचे काही अनुभव सांगण्यास मुद्दामून हा लेख लिहितो आहे.आपण ना. गुलाबरावजी पाटील साहेबांचे साधेपण आणि जमिनीशी जुळलेली नाळ खूप जवळून अनुभवली आहे.तसेच बऱ्याच मंत्र्यांचे आलिशान पोर जे थोडी सत्ता येताच माज घुमावणारे पोर पण तितक्याच जवळून आपल्याच जिल्ह्यात बघितले आहे.हा लेख आहे माझ्या मित्रा बद्दल ”प्रतापराव” बद्दल. तो माझा मित्र आहे म्हणून मी हे लिहितोय असे मुळीच नाही, तर खरा प्रतापराव लोकांना कळावा म्हणून लिहितोय.

🚶‍♂️ वारीची सुरुवात – सेवा सुरू

वारी निघायच्या दिवशी आम्ही सगळे स्टेशन वर जमायला सुरुवात झाली. वारकऱ्यांची जमवा जमाव सुरू झाली.हा भाऊ कोणत्या AC वेटिंग रूम मधे न बसता, उन्हात असो अथवा पावसात असो, स्वतः प्लेटफॉर्म वर उभा राहून प्रत्येकाच्या जवळ जाऊन विचारपूस करून प्रत्येकाची अडचण सोडवत होता.

🕓 ४ वाजेपासून ते ट्रेन निघेपर्यंत म्हणजे १० वाजेपर्यंत — एक मिनिटही बसला नाही.

🚆 साथ प्रवासाची – नेत्यानं दाखवली संगत स्वतः त्याच ट्रेन मधे बसून सोबतीला प्रवासाला निघाला. साहेबानो, आता प्लेटफॉर्म वर सगळ्यांची भेट झालेलीच होती. तरी पूर्ण ट्रेन मधे ३ दा हा भाऊ प्रत्येका जवळ वैयक्तिक जाऊन भेटून सगळ्यांची विचारपूस करून सकाळी ३ वाजता आपल्या झोपण्याच्या बर्थ वर आला.इतका थकलेला हा आपला भाऊ ना अंथरूण घेतले, ना पांघरूण घेतले ना डोक्याखाली उशी होती.आज इतक्या मोठ्या मंत्र्यांचा पुत्र, स्वतः माजी जि.प. सदस्य असून, असाच डोक्यावर रुमाल बांधून झोपून गेला हो…

🌞 सकाळचं तेज – थकवा नव्हता जवळपासही पुन्हा सकाळी उठून फ्रेश, थकवा तर कुठेच आसपासही फिरकत नव्हता. रेल्वे स्टेशन पासून तर मठापर्यंत सर्व वारकऱ्यांसोबत २.५ की. मी. चे अंतर पायी चालत गाठले.

🍽️ भुकेल्यांना अन्न… सेवाभावी पंगती पुन्हा तिथे दोन्ही दिवस सर्व वारकऱ्यांच्या पंगतीत उभे राहून,प्रत्येकाला पोटभर जेवण होईपर्यंत लक्ष देऊन,सर्वांच्या शेवट जेवायला बसणारा हा मंत्रीपुत्र.

🛤️ परतीची वारी – लोकसेवेचा अखंड ध्यास पुन्हा परतीच्या प्रवासात सगळ्यांना जागेवर बसवून, सगळ्यांची विचारपूस करून मग आपल्या जागेवर येणारा असा हा आमचा लोकनेता.

🪔 हा लेख प्रसिद्धी म्हणून नाही, तर लोकनेता म्हणून ओळख निर्माण करणे नव्हे, तर लोकात राहून काम करणे हा गुण आमच्या प्रतापराव मधे आहे हे दर्शवण्यासाठी लिहिला आहे.

✍️ यात लिहिण्यासारखे अजून खूप आहे… पण शब्दांना विराम द्यावा व थोडक्यात मांडता यावे हे प्रयत्न…

> “लोकसेवेचा खरा अर्थ तोच जाणतो, जो आपल्या नावावर नव्हे, लोकांच्या चेहऱ्यावर हसू पाहतो!”

🌸 जसे भक्त पुंडलिकांनी आई वडिलांची सेवा करून पांडुरंगाला बोलावले… तसे हा आमचा भक्त जनसागरातल्या आई बापाची सेवा करून पांडुरंगापर्यंत नेतो…

“राजकारण हे केवळ खुर्चीसाठी नसावं,
ते जनतेच्या चरणी झुकून त्यांच्या सेवेसाठी असावं!”

 

🕉️ रामकृष्ण हरी…🪴🙏🏻

✍🏻 लेखक: धनराज कासट, पाळधी

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!